शिक्षकांनी लावल्या काळ्या फिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 10:32 PM2019-01-14T22:32:17+5:302019-01-14T22:32:34+5:30

प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी मारोती चलाख यांनी गडचिरोली तालुक्यातील गिलगाव बाजार येथे क्रीडा संमेलनादरम्यान आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्याचा सोमवारी शिक्षक संघटनांतर्फे शिक्षकांनी जिल्हाभर काळ्याफिती लावून काम करीत निषेध नोंदविला. चलाख यांच्यावर कारवाई करण्याची मागणी संघटनांनी केली.

Black bucks imposed by teachers | शिक्षकांनी लावल्या काळ्या फिती

शिक्षकांनी लावल्या काळ्या फिती

Next
ठळक मुद्देसंघटना आक्रमक : प्राथमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या वक्तव्याचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी मारोती चलाख यांनी गडचिरोली तालुक्यातील गिलगाव बाजार येथे क्रीडा संमेलनादरम्यान आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्याचा सोमवारी शिक्षक संघटनांतर्फे शिक्षकांनी जिल्हाभर काळ्याफिती लावून काम करीत निषेध नोंदविला. चलाख यांच्यावर कारवाई करण्याची मागणी संघटनांनी केली.
गडचिरोली तालुका अंतर्गत गिलगाव येथे तालुकास्तरीय क्रीडा संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात उपशिक्षणाधिकारी मारोती चलाख यांनी शिक्षकांप्रती अपमानास्पद वक्तव्य केले. त्यांनी शिक्षकांचा जाहीरपणे अपमान केला, असा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. उपशिक्षणाधिकारी मारोती चलाख यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी चामोर्शी येथील जुनी पेंशन हक्क संघटना व जिल्हाभरातील शिक्षक संघटनांनी केली आहे. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून सोमवारी शिक्षकांनी काळ्याफिती लावून काम केले.
या आंदोलनात महाराष्टÑ राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनचे तालुकाध्यक्ष प्रवीण पोटवार, सरचिटणीस सुजित दास, कोषाध्यक्ष महादेव डे, महिला आघाडी प्रमुख नंदिनी गेडाम, उपाध्यक्ष नीलेश मानापुरे, सुरेंद्र चनेकर, सुनील खोब्रागडे, प्रदीप भुरसे, राजेश सरकार, शिवराज हुलगुंडे, मेहबूब शेख, दीपक केंद्रे, माणिक वरपडे, रवी दुर्गे, जगदीश कळाम, बापू भोयर, जितेंद्र कोहळे, अनिमेष बिश्वास, संतोष गुट्टे, मदन आभारे, सचिन वाकडे, राजेश सरकार, अमित बारसागडे, रवी दुर्गे, गोपाल सरकार, हेमंत दुर्गे, टिकेश ढवळे, निहार मिस्त्री, शंकर मंडल, सुरेश चव्हाण, रोशन बागळे सहभागी झाले.
जिल्हा परिषद कन्या शाळा चोप, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडेगाव, विसोरा, जेप्रा, दिभना यांच्यासह जिल्हाभरातील शिक्षकांनी ठिकठिकाणी काळ्याफिती लावून आंदोलन केले.

Web Title: Black bucks imposed by teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.