पुन्हा एकदा चालली भाजपची जादू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:39 AM2019-05-24T00:39:51+5:302019-05-24T00:45:46+5:30

लोकसभेच्या गडचिरोली-चिमूर मतदार संघात पुन्हा एकदा भाजपला कौल देत मतदारांनी अशोक नेते यांना सलग दुसऱ्यांदा संसदेत जाण्याची संधी दिली आहे. नेते यांना २१ व्या फेरीअखेर ४ लाख ७७ हजार ३६७ तर काँग्रेसचे डॉ.नामदेव उसेंडी यांना ४ लाख ५ हजार ७८४ मतांचे दान मिळाले.

BJP magic again | पुन्हा एकदा चालली भाजपची जादू

पुन्हा एकदा चालली भाजपची जादू

Next
ठळक मुद्देगडचिरोली-चिमूरच्या सहाही विधानसभा मतदारसंघांचा कौलभाजपच्या आमदारांनी मिळवून दिली मतदारसंघात आघाडीअहेरी आणि ब्रह्मपुरी मतदारसंघात आमदारांना धोक्याची घंटा?

लोकमत न्यूज नेटवर्क । गडचिरोली : लोकसभेच्या गडचिरोली-चिमूर मतदार संघात पुन्हा एकदा भाजपला कौल देत मतदारांनी अशोक नेते यांना सलग दुसऱ्यांदा संसदेत जाण्याची संधी दिली आहे. नेते यांना २१ व्या फेरीअखेर ४ लाख ७७ हजार ३६७ तर काँग्रेसचे डॉ.नामदेव उसेंडी यांना ४ लाख ५ हजार ७८४ मतांचे दान मिळाले. डॉ.उसेंडी सलग दुसऱ्यांदा पराभवाच्या छायेत आले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे डॉ.रमेशकुमार गजबे यांनी १ लाख ५ हजार ३५१ मते घेऊन तिसरे स्थान पटकावले होते. उर्वरित दोन उमेदवारांपैकी बसपाचे हरिश्चंद्र मंगाम यांना २६ हजार १२३ तर आंबेडकराईट पार्टीचे देवराव नन्नावरे यांना १५ हजार १२० मते मिळाली. काही फेºयांचे निकाल जाहीर होणे बाकी होते.

येथील चंद्रपूर मार्गावरील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी ८ वाजता मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. पोस्टल मतदानाचे सीलबंद लिफाफे फोडल्यानंतर ८.१५ च्या सुमारास मतपत्रिका मोजणीला सुरूवात झाली. सोबतच स्ट्राँग रूममध्ये ठेवलेल्या ईव्हीएम मशिन बाहेर काढून विधानसभा मतदार संघनिहाय त्यांची मतमोजणी सुरू करण्यात आली.
ईव्हीएमचा पहिल्या फेरीचा निकाल सकाळी ९ वाजेपर्यंत येणे अपेक्षित होता. परंतू प्रत्यक्षात १० वाजून २० मिनिटांनी पहिल्या फेरीचा निकाल निवडणूक निर्णय अधिकारी शेखर सिंह यांनी जाहीर केला. पहिल्या ३ फेºयांपर्यंत हे काम अतिशय संथगतीने सुरू होते. त्यानंतर मतमोजणीच्या कामाला थोडा वेग आला.
दुपारी ३ वाजेपर्यंत १३ फेºयांचे निकाल जाहीर करण्यात आले होते. परंतू त्यानंतर निकाल जाही करणे अचानक थांबविण्यात आले. निकाल का थांबले याची माहिती कोणालाच मिळत नव्हती. अखेर सायंकाळी ६ च्या सुमारास पुन्हा निकाल जाहीर करणे सुरू झाले. रात्री ९.३० वाजेपर्यंत २१ फेºयांचे निकाल जाहीर झाले होते. त्यानंतर पुन्हा निकाल थांबविण्यात आले. व्हीव्हीपॅटमधील मतांची पडताळणी करण्यासाठी हे निकाल थांबविण्यात आल्याचे नंतर सांगण्यात आले.
रात्री १० वाजेपर्यंत संपूर्ण निकाल जाहीर होईल अशी अपेक्षा असताना रात्री उशिरापर्यंत मतमोजणीचे काम सुरूच होते. त्यामुळे मतमोजणी कर्मचारी आणि बंदोबस्तावर असलेले पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यावरील ताण वाढत होता.
मतमोजणी केंद्राबाहेर निकाल ऐकण्यासाठी मोठी गर्दी होईल असे वाटत असताना प्रत्यक्षात मात्र हा अंदाज फोल ठरला. व्हाट्स अ‍ॅपवरून येणारे संदेश आणि टिव्हीवर दिसणारा निकाल पाहण्यातच बहुतांश मतदार व्यस्त होते. त्यामुळे आयटीआय चौक ते जिल्हा न्यायालय हा मार्ग बंद ठेवण्याची गरजच पडली नाही. या मार्गावरून छोट्या वाहनांची वाहतूक दिवसभर सुरू होती. मात्र जड वाहनांची वाहतूक सेमानामार्गेच सुरू होती.

प्रथमच सलग दुसºयांदा भाजपला संधी
२००९ मध्ये अस्तित्वात आलेला गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघ किंवा तत्पूर्वीच्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाला सलग दुसºयांदा संधी मिळालेली नाही. परंतू यावेळी प्रथमच खासदार अशोक नेते यांनी ही किमया केली. २०१४ च्या निवडणुकीत नेते यांना ५ लाख ३५ हजार ९८२ मते मिळून २ लाख ३६ हजार ८७० मतांची आघाडी होती.

गडचिरोलीला आतापर्यंत भाजपचे चार वेळा खासदार लाभले. चंद्रपूर मतदार संघात १९९६ मध्ये हंसराज अहीर यांच्या रूपाने भाजपचे पहिले खासदार मिळाले. त्यानंतर २००४ मध्ये पुन्हा अहीर यांनाच गडचिरोलीचे खासदार होण्याची संधी मिळाली. गडचिरोली-चिमूर मतदार संघ झाल्यानंतर २०१४ मध्ये आणि आता २०१९ मध्ये अशोक नेते भाजपचे खासदार झाले आहेत.

Web Title: BJP magic again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.