भामरागडच्या कबड्डीपटू राष्ट्रीयस्तरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 01:07 AM2018-01-20T01:07:39+5:302018-01-20T01:07:54+5:30

भामरागड तालुक्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या विद्यार्थिनींची राष्ट्रीयस्तरीय कबड्डी स्पर्धेकरिता निवड झाली असून या स्पर्धेसाठी विद्यार्थिनी रवाना झाल्या आहेत.

Bhamragad Kabaddi Player At the National Level | भामरागडच्या कबड्डीपटू राष्ट्रीयस्तरावर

भामरागडच्या कबड्डीपटू राष्ट्रीयस्तरावर

Next
ठळक मुद्देपंजाबमधील मुनक येथे स्पर्धा : कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे सुयश

लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : भामरागड तालुक्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या विद्यार्थिनींची राष्ट्रीयस्तरीय कबड्डी स्पर्धेकरिता निवड झाली असून या स्पर्धेसाठी विद्यार्थिनी रवाना झाल्या आहेत.
इंडियन वुमन आॅलंपिक असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने १९ ते २१ जानेवारीदरम्यान पंजाबमधील मुनक या ठिकाणी सदर स्पर्धा होणार आहे. १४ ते १७ वयोगटातील दोन कबड्डी चमूंची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, प्राथमिक शिक्षणाधिकारी ओमप्रकाश गुडे यांच्या पुढाकाराने सदर विद्यार्थिनी राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धेसाठी जाणार आहेत. विद्यार्थिनींना कबड्डी स्पर्धेत तरबेज करण्यासाठी मुख्याध्यापक मुडपल्लीवार, सहायक शिक्षक डीवरे, सयाम, वेलादी, साधनव्यक्ती तुलावी, शिक्षिका कुथे, कंडे, आवारी, सोरदे यांनी प्रोत्साहन दिले.
भामरागड सारख्या दुर्गम व आदिवासी बहुल विद्यार्थिनींची राष्ट्रीय स्तरावरील खेळासाठी निवड झाल्याने या विद्यार्थिनींचे कौतुक केले जात आहे. विद्यार्थिनींचे हे यश दुर्गम भागातील विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.
दुर्गम भागातील विद्यार्थी क्रीडा स्पर्धांमध्येही चमकू शकतात. त्यांना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षणाची गरज आहे.

Web Title: Bhamragad Kabaddi Player At the National Level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.