समस्या मांडण्यासाठी एकजूट व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:27 AM2017-11-20T00:27:58+5:302017-11-20T00:28:38+5:30

शिक्षकांच्या अनेक मागण्या शासनस्तरावर प्रलंबित आहेत. या मागण्या मान्य व्हाव्या, याकरिता शिक्षक परिषदेच्या वतीने वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे.

Be united to present the problem | समस्या मांडण्यासाठी एकजूट व्हा

समस्या मांडण्यासाठी एकजूट व्हा

Next
ठळक मुद्देमान्यवरांचा सूर : सिरोंचातील शिक्षक परिषदेच्या मेळाव्यात समस्यांवर चर्चा

ऑनलाईन लोकमत 
सिरोंचा : शिक्षकांच्या अनेक मागण्या शासनस्तरावर प्रलंबित आहेत. या मागण्या मान्य व्हाव्या, याकरिता शिक्षक परिषदेच्या वतीने वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. सदर समस्या मांडण्याकरिता शिक्षक परिषदेच्या सदस्यांनी एकजूट होऊन संघटन मजबूत करावे, असा सूर मान्यवरांनी सिरोंचा येथे शनिवारी आयोजित शिक्षक परिषदेच्या तालुका मेळाव्यात काढला.
सिरोंचातील ए. पी. जे. अब्दुल कलाम चौकातील जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्टÑ राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष संतोष सुरावार होते. उद्घाटन धर्मराव कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एम. बी. येगेवार यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आ. नागो गाणार, प्रमुख अतिथी म्हणून कमलेश वाजपेयी, सल्लम चकीनारपू, गोपाल मुनघाटे, अविनाश तालापल्लीवार, सुभाष कुलसंगे उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य येग्गेवार म्हणाले, शासन विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना राबवित आहे. परंतु लाभासाठी विविध कागदपत्रांची आवश्यकता असते. त्यामुळे योजना प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी पालकांकडून कागदपत्रे सादर करणे आवश्यक असते. परंतु मिळणाºया लाभापेक्षा कागदपत्रांची जुळवाजुळव करताना अधिक खर्च होतो. कमलेश वाजपेयी म्हणाले, शिक्षकांच्या समस्या शासनदरबारी मांडून त्या सोडविण्यासाठी शिक्षक आमदार प्राधान्य देत आहेत. त्याचप्रमाणे शिक्षकांनी संघटना मजबूत करणे गरजेचे आहे. याप्रसंगी मार्गदर्शन करताना आ. नागो गाणार म्हणाले, शिक्षकांनी आपल्या अडचणी, समस्या मांडाव्या. त्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू. प्रत्येक वेळी शासनाकडून पारित परिपत्रक त्यावर येणाºया अडचणी तसेच बदली प्रक्रिया करताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, अशा पद्धतीने बदली प्रक्रिया राबविणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. बदली प्रक्रिया व जिल्ह्यातील २२० नियमबाह्य बदल्या यावरही त्यांनी विचार व्यक्त केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमस्थळी पोहोचण्यापूर्वी आ. गाणार यांनी येथील मेदाश्री कॉन्व्हेंटला भेट देऊन विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले.
संचालन खराबे, प्रास्ताविक व्ही. आईतवार यांनी केले. यशस्वीतेसाठी व्ही. व्ही. पडीशालवार, कलकोटवार यांच्यासह शिक्षक परिषदेच्या सदस्यांनी सहकार्य केले.

Web Title: Be united to present the problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.