३३५ कक्षांमध्ये बांबू कटाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 11:14 PM2019-02-21T23:14:52+5:302019-02-21T23:16:43+5:30

जिल्ह्यातील ३३५ कम्पार्टमेंटमधील बांबू कटाई योग्य झाला आहे. या माध्यमातून पेसा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या २१३ गावांना रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी कटाईयोग्य बांबूचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे बांबूतून मिळणारे ग्रामसभांचे उत्पन्न गेल्यावर्षीपेक्षा घटणार आहे.

Bamboo harvesting in 335 cells | ३३५ कक्षांमध्ये बांबू कटाई होणार

३३५ कक्षांमध्ये बांबू कटाई होणार

Next
ठळक मुद्दे२१३ गावांना रोजगार : गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्पन्नात येणार घट

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील ३३५ कम्पार्टमेंटमधील बांबू कटाई योग्य झाला आहे. या माध्यमातून पेसा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या २१३ गावांना रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी कटाईयोग्य बांबूचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे बांबूतून मिळणारे ग्रामसभांचे उत्पन्न गेल्यावर्षीपेक्षा घटणार आहे.
जिल्ह्यातील जंगलात मोठ्या प्रमाणात बांबू उपलब्ध आहे. त्यामुळे तेंदूनंतर सर्वाधिक रोजगार बांबूच्या माध्यमातून उपलब्ध होतो. त्यामुळे बांबू कटाईच्या कामाची नागरिक प्रतीक्षा करीत राहतात. दर तीन वर्षांनी बांबू कटाईसाठी परिपक्व होतो. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ५०० कम्पार्टमेंटमध्ये बांबू आढळून येतो.
मागील वर्षी २४४ गावांनी ३७१ कम्पार्टमेंटमध्ये बांबूची तोड केली होती. बांबू तोडून थेट व्यापाºयाला विकला जातो. त्यामुळे यातून ग्रामसभांना नगदी पैसा उपलब्ध होतो. यावर्षी २१३ गावांच्या सिमेंतर्गत येणाºया ३३५ कम्पार्टमेंटमधील बांबू परिपक्व झाला असल्याने तो तोडण्याची परवानगी वनविभागाने ग्रामसभांना दिली आहे.
ग्रामसभांना बांबू कटाईचे अधिकार दिले असले तरी बांबू परिपक्व झाला किंवा नाही, याची खात्री करण्याची जबाबदारी वन विभागाकडे आहे. मोठ्या प्रमाणात बांबूची तोड होऊन बांबूचे झाड पूर्णपणे नष्ट होणे हा या मागील उद्देश आहे. तेंदूप्रमाणेच बांबूमध्येही पर्याय २ व पर्याय १ निवडण्याची सुविधा ग्रामसभांना दिली आहे. मात्र बांबूच्या माध्यमातून गावातील नागरिकांना जवळपास चार ते सहा महिने रोजगार उपलब्ध होते. तसेच थेट पैसा ग्रामसभेला उपलब्ध होते.
बांबू खरेदी करणारे व्यापारी गावातच येतात. या सर्व सुविधांमुळे ग्रामसभा पर्याय २ ची निवड करून बांबू कटाई स्वत:च करतात. यातून ग्रामसभांना कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते.

रांझी नष्ट होण्याच्या मार्गावर
बांबूची कटाई करताना ती व्यवस्थित करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर परिपक्व झालेला बांबूच तोडणे आवश्यक आहे. मात्र काही ग्रामसभा लालसेपोटी परिपक्व न झालेलाही बांबू तोडत आहेत. संपूर्ण रांझीच नष्ट केली जात आहे. त्यामुळे नवीन रोपटे तयार होत नाही. परिणामी काही दिवसातच बांबूची रांझी नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नवीन येणाºया फुटव्याला आधारासाठी जुने झाड काही प्रमाणात शिल्लक राहणे आवश्यक आहे. मात्र एकही रांझी शिल्लक राहत नसल्याने नवीन फुटवा वाकतो व तो निकामी होतो. याकडे वन विभागाच्या अधिकाºयांनी लक्ष देऊन बांबू कटाईचे नियम धुडकाविणाºया ग्रामसभांवर कारवाई करण्याची मागणी आहे.

Web Title: Bamboo harvesting in 335 cells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.