एसपींशी चर्चेनंतर आॅटोची वाहतूक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:56 AM2018-09-23T00:56:52+5:302018-09-23T00:57:10+5:30

गडचिरोली शहर ते कॉम्प्लेक्स परिसरापर्यंत चालविण्यात येणाऱ्या आॅटोमध्ये केवळ तीन प्रवाशी बसविण्याचे निर्देश पोलीस विभागाने दिले. या निर्णयाविरोधात आॅटो चालक मालक संघटनेच्या वतीने शुक्रवारी आॅटोची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.

Auto transport after espionage talks | एसपींशी चर्चेनंतर आॅटोची वाहतूक सुरू

एसपींशी चर्चेनंतर आॅटोची वाहतूक सुरू

Next
ठळक मुद्देनियम पाळण्याच्या सूचना : न्याय देण्याची आॅटो चालकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली शहर ते कॉम्प्लेक्स परिसरापर्यंत चालविण्यात येणाऱ्या आॅटोमध्ये केवळ तीन प्रवाशी बसविण्याचे निर्देश पोलीस विभागाने दिले. या निर्णयाविरोधात आॅटो चालक मालक संघटनेच्या वतीने शुक्रवारी आॅटोची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. सकाळपासूनच आॅटोची वाहतूक बंद राहिल्याने शासकीय कर्मचाºयांसह सर्वसामान्यांचे हाल झाले. दरम्यान संघटनेचे पदाधिकारी व आॅटो चालकांनी सायंकाळी पोलीस अधीक्षक बलकवडे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे समस्या मांडली. त्यांनी आॅटो चालकांनी गणेवश घालून आॅटो चालवावा, तसेच इतर नियमाचे पालन करावे, अशा सूचना देऊन आॅटोमधून प्रवासी वाहतूक करण्यास सांगितले. त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच गडचिरोलीच्या बसस्थानकापासून ते कॉम्प्लेक्सपर्यंत आॅटोची वाहतूक सुरू झाली आहे.
गुरूवारी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर-सावनेर मार्गावर एका अपघातात आॅटोमधील सात लोकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांनी शहरातून चालविण्यात येणाºया आॅटोमध्ये केवळ तीन प्रवाशी बसविण्याचे निर्देश त्यांनी चालकांना दिले. त्यामुळे आॅटो चालकांनी शुक्रवारी दिवसभर आॅटोची प्रवासी वाहतूक बंद ठेवली होती. विद्यमान केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ केली आहे. त्यामुळे तीन प्रवाशांची वाहतूक करणे परवडत नाही.
शिवाय पोलीस विभागातर्फे काही आॅटो चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईने व नियमामुळे आॅटो चालकांची अडचण वाढली आहे. अशी समस्या आॅटो चालक मालक संघटनेच्या पदाधिकाºयांनी पोलीस अधीक्षकांपुढे मांडली. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी नियमानुसार वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार आॅटो चालकांनी शनिवारपासून वाहतूक पूर्ववत सुरू केली.

सात ते आठ प्रवाशी आढळून आलेल्या आॅटो चालकावर पोलीस विभागामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे आॅटो चालक अडचणीत आले आहे. डिझेलचे दर वाढल्यामुळे तीन प्रवाशांची वाहतूक करणे आॅटो चालकांना परवडत नाही. त्यामुळे पोलीस विभागाने आॅटो चालकाला सवलत द्यावी, अशी आमची मागणी आहे. यानंतरही पोलीस विभागाकडून कारवाई झाल्यास आॅटोची वाहतूक पुन्हा बंद करावी लागेल.
- अविनाश आत्राम, अध्यक्ष, आॅटो युनियन गडचिरोली

Web Title: Auto transport after espionage talks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.