Attempt to crack at Ashti's rural bank in Gadchiroli district; Wall breaks | गडचिरोली जिल्ह्यातल्या आष्टीच्या ग्रामीण बँकेत दरोड्याचा प्रयत्न; भिंत फोडली

ठळक मुद्देबँकेत शिरता आले नाही

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी भिंत फोडून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला.
येथील चंद्रपूर मार्गावर असलेल्या ग्रामीण बँकेत डाव्या बाजूच्या गल्लीमधील भिंतीला चोरट्यांनी मोठे भगदाड पाडले. तयात हात टाकून बँकेच्या हॉलमधील फरशीसुद्धा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांना या छिद्रातून आत शिरता न आल्याने चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाल्याने चोरटे पहाटेच्या सुमारास पसार झाले. त्यानंतर बँकेचा शिपाई बँक उघडण्यासाठी बँक उघडण्यासाठी सकाळी गेल्यावर हा प्रकार त्याच्या लक्षात आला. लगेच त्यांनी याबाबतची माहिती शाखा अधिकाऱ्यांना दिली. शाखाधिकाऱ्यांनी आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आष्टी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.