Attackers of smugglers attacked | तस्करांचा वनकर्मचाऱ्यांवर हल्ला

ठळक मुद्देवाहनाच्या काचा फोडल्या : वनकर्मचाºयांकडून सात बैल, तीन बंड्यांसह सागवान जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आसरअल्ली वनपरिक्षेत्राच्या कोपेला उपक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांनी आसअरल्ली-कोपेला मार्गावर पाळत ठेवून सात बैल, तीन बंड्या व नऊ नग सागवान लठ्ठे जप्त केल्याची कारवाई ११ जानेवारी रोजी गुरूवारला सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास केली. या घटनेतील वनतस्करांनी सर्व साहित्य घटनास्थळीच ठेवून पोबारा केला. त्यानंतर रात्र झाल्याने वनखंड ३०२ मध्ये वनकर्मचाºयांच्या शासकीय वाहनावर दगडफेक करून तस्करांनी हल्ला केला.
कोपेलाचे क्षेत्र सहायक एम.के. तिम्मा, वनरक्षक एस.डी. हलामी, आसरअल्लीचे क्षेत्र सहायक एल.एम. शेख व वनरक्षक पी.एन. नरवास यांनी एमएच-३४-८३७९ क्रमांकाच्या शासकीय वाहनाने कोपेला उपक्षेत्राच्या जंगलात जाऊन चोर रस्त्यावर पाळत ठेवली. याच रस्त्याने सागवान लठ्ठे घेऊन बैलबंडी येताना दिसल्या. यावेळी सर्व कर्मचाºयांनी मिळून या बैलबंड्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र तस्करांनी सर्व बैलबंड्या घटनास्थळी सोडून पोबारा केला.
वनखंड क्र. ३०२ मध्ये आल्यावर रात्र झाल्याने वनकर्मचारी शेख, नरवास यांनी भ्रमणध्वनीद्वारे आसरअल्ली येथे संपर्क साधून उर्वरित कर्मचाºयांना बोलविले असता, आसरअल्ली येथून पाच कर्मचारी दुचाकीने तेथे पोहोचले. त्यानंतर सर्व कर्मचारी मिळून बैलबंड्या घेऊन आसरअल्लीजवळ येताच परीक्षेत्र कॉलनीवरून अंदाजे ५०० मीटर अंतरावर सागवान तस्करांनी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास एमएच-३४-८३७९ क्रमांकाच्या शासकीय वाहनावर दगडफेक करून हल्ला केला. यात सदर वाहनाचे मागील व समोरील काच फुटले. वाहनचालक महेश डबुला याच्या खांद्याला दगडाचा मार लागला. त्यानंतर सर्व कर्मचाºयांनी एकत्र होऊन हल्ला करणाºया तस्करांना पळवून लावले. या घटनेबाबत क्षेत्रसहायक शेख यांनी आसरअल्ली पोलीस ठाण्यात रात्री ८.३० वाजताच्या सुमारास तक्रार नोंदविली. १.८३ घनमीटर, ९ सागवान लठ्ठे जप्त करण्यात आले असून या मालाची किंमत ९२ हजार १०३ रूपये आहे. याशिवाय सात बैल व तीन बंड्या वनकर्मचाऱ्यांनी जप्त केल्या. पसार झालेल्या सागवान तस्करावर वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Web Title: Attackers of smugglers attacked
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.