एटीएमधारकांची ससेहोलपट सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 12:22 AM2019-01-06T00:22:05+5:302019-01-06T00:23:08+5:30

रिझर्व बँक आॅफ इंडियाच्या निर्देशानुसार जुने तंत्रज्ञान असलेले मॅगस्ट्रिप कार्ड ३१ डिसेंबर २०१८ रोजी बंद करण्यात आले. या ग्राहकांना नवीन कार्ड उपलब्ध करून देणे आवश्यक होते. मात्र अनेकांचे एटीएम कार्ड बँकेमध्ये आलेच नाही.

ATM holders continue to lynch | एटीएमधारकांची ससेहोलपट सुरूच

एटीएमधारकांची ससेहोलपट सुरूच

Next
ठळक मुद्देएटीएम कार्डचा तुटवडा : जवळपास एक लाख एटीएम बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : रिझर्व बँक आॅफ इंडियाच्या निर्देशानुसार जुने तंत्रज्ञान असलेले मॅगस्ट्रिप कार्ड ३१ डिसेंबर २०१८ रोजी बंद करण्यात आले. या ग्राहकांना नवीन कार्ड उपलब्ध करून देणे आवश्यक होते. मात्र अनेकांचे एटीएम कार्ड बँकेमध्ये आलेच नाही. त्यामुळे एटीएमधारकांची ससेहोलपट सुरूच आहे.
बँकांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी जो मागेल त्याला एटीएम देणे सुरू केले. यापूर्वीच्या एटीएमला मॅगस्ट्रिप एटीएम कार्ड म्हटले जात होते. यामध्ये जुने तंत्रज्ञान असल्याने या एटीएम कार्डमुळे काहींना फसवणुकीच्या घटना घडल्या. यावर आळा घालण्यासाठी मायक्रो चिप असलेले ईएमव्ही (युरोपीयन मास्टर व्हिजा) कार्ड वापरण्याचा निर्णय आरबीआयने घेतला. जुने सर्व एटीएम कार्ड ३१ डिसेंबर २०१८ नंतर बंद होतील. अशा सूचना रिझर्व बँकेने बँकांना दिल्या होत्या. बँकांनीही संबंधित ग्राहकांना याबाबतची सूचना संदेशाच्या माध्यमातून दिली होती. मात्र जुने एटीएम कार्ड सुरू असेपर्यंत ग्राहकांनी नवीन कार्ड बदलून घेतले नाही. ३१ डिसेंबर रोजी जुने कार्ड बंद झाल्यानंतर एकच हाहाकार माजला. अनेकांना तर एटीएम कार्ड का काम करीत नाही, हे सुद्धा माहित नव्हते. बँकेत जाऊन विचारणा केल्यानंतर नेमके कारण कळले. जिल्हाभरातील जवळपास एक लाख एटीएम कार्ड बंद पडले. सदर एटीएम कार्ड विनामूल्य बदलून देणे ही त्या शाखेची व बँकेची जबाबदारी आहे. मात्र अनेकांचे नवीन एटीएम कार्ड अजूनही उपलब्ध झाले नाही. त्यामुळे ग्राहकांची अडचण वाढली आहे. राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जाऊन ग्राहक विचारणा करीत आहेत. मात्र मुख्य शाखेकडून कार्डच उपलब्ध झाले नसल्याचे सांगितले जात आहे. यावरून आणखी काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्हा बँकेचे आठ हजार कार्ड बदलले
गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुद्धा आपल्या ग्राहकांना एटीएम सेवा देते. या बँकेचे एकूण १९ हजार ८५ एटीएमधारक ग्राहक आहेत. ३१ डिसेंबर २०१८ नंतर जुने कार्ड बंद होणार, याबाबत बँकेने ग्राहकांना आॅक्टोबर महिन्यातच मेसेज पाठवून याबाबतची सूचना दिली होती. काही जागरूक ग्राहकांनी वेळेतच एटीएम कार्ड बदलवून घेतले. आतापर्यंत ८ हजार ३३२ ग्राहकांनी नवीन एटीएम कार्ड बदलून घेतले आहेत.

Web Title: ATM holders continue to lynch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :atmएटीएम