अन् मृत्यूच्या दाढेतून ते सुखरूप बाहेर आले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 06:12 PM2018-08-21T18:12:32+5:302018-08-21T18:13:08+5:30

पाण्यातून पलिकडे जाण्याची ‘हिंमत’ दाखवत त्यांनी गाडी पुढे दामटली. पण हा अतिआत्मविश्वास त्यांना नडला आणि त्यांची कार वाहत्या पाण्यासोबत नाल्याच्या पाण्यात पडली.

And they were safely out of death | अन् मृत्यूच्या दाढेतून ते सुखरूप बाहेर आले

अन् मृत्यूच्या दाढेतून ते सुखरूप बाहेर आले

Next

 गडचिरोली -  संततधार पावसामुळे नाल्याला पूर आलेला होता. नाल्यावरच्या छोट्या पुलावरूनही पाणी वाहात होते. त्या पाण्यातून पलिकडे जाण्याची ‘हिंमत’ दाखवत त्यांनी गाडी पुढे दामटली. पण हा अतिआत्मविश्वास त्यांना नडला आणि त्यांची कार वाहत्या पाण्यासोबत नाल्याच्या पाण्यात पडली. दैव बलवत्तर म्हणून वेळीच लोकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृत्यूच्या दाढेतून त्यांना सुखरूप बाहेर काढले.

निखिल सत्यनारायण चेरकरी (२७) आणि देवदत्त शरद धारणे (२६) रा.कन्नमवार वार्ड, गडचिरोली अशी त्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही मंगळवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास एका कारने गडचिरोलीपासून पोटेगावच्या दिशेने निघाले होते. १० किलोमीटरवर असलेल्या गुरवळजवळ शिवमंदिराच्या अलिकडे असलेल्या नाल्याला पूर आला होता. पुराचे पाणी पुलावरून वाहात होते. पण दोघांनीही अतिआत्मविश्वास दाखवत वाहत्या पाण्यातून कार काढण्याचा प्रयत्न केला. परिणाम पाण्याच्या प्रवाहासोबत कार पुलाखाली पडून नाल्यात जवळपास ५० फूट वाहात गेली व एका झाडाला अडली. अनपेक्षितपणे घडलेल्या या प्रकाराने त्या युवकांची चांगलीच भंबेरी उडाली. पण प्रसंगावधान राखत एकाने गाडीच्या टपाला पकडले तर दुसरा लगतच्या झाडावर चढला. 

हे दृष्य पाहात असलेल्या नाल्याच्या काठावरील लोकांनी लगेच गडचिरोली पोलीस ठाण्याला फोन करून माहिती दिली. पोलीस सर्व साहित्यानिशी घटनास्थळी दाखल झाले आणि ट्युब व दोराच्या सहाय्याने त्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढले. यावेळी तहसीलदार डी.एस.भोयर, नायब तहसीलदार किरमे, दुरणकर, मडावी तसेच सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय उदार, उपनिरीक्षक विवेक सिसाळ, सहायक फौजदार सहारे, गौरकर, तिम्मलवार आदी उपस्थित होते.

Web Title: And they were safely out of death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.