-तर दारूड्यांना हाकलून लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 01:15 AM2019-03-24T01:15:48+5:302019-03-24T01:16:38+5:30

गावात दारू मिळत नसल्याने काही जण धानोरा येथे जाऊन दारू पिऊन येतात. तर काही जण दारूचा काही साठा सोबत घेऊन येतात. त्याचबरोबर लपून-छपून गावाबाहेर काही जण दारूची विक्री करतात. अशांवर अंकुश ठेवण्यासाठी त्यांना शेवटची समज दिली जाणार आहे.

-And the pirates will be released | -तर दारूड्यांना हाकलून लावणार

-तर दारूड्यांना हाकलून लावणार

Next
ठळक मुद्देकाकडयेली गावाचा निर्णय : निवडणुकीदरम्यान दारूला पूर्णपणे करणार हद्दपार

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : गावात दारू मिळत नसल्याने काही जण धानोरा येथे जाऊन दारू पिऊन येतात. तर काही जण दारूचा काही साठा सोबत घेऊन येतात. त्याचबरोबर लपून-छपून गावाबाहेर काही जण दारूची विक्री करतात. अशांवर अंकुश ठेवण्यासाठी त्यांना शेवटची समज दिली जाणार आहे. यानंतरही दारू पिणे व विक्री करण्याचे प्रयत्न सुरूच ठेवल्यास संबंधित व्यक्तीला गावाबाहेर हाकलून लावण्याचा निर्णय काकडयेली ग्रामसभेने शुक्रवारी घेतला.
धानोरा तालुक्यातील काकडयेली येथील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान दारूला पूर्णत: हद्दपार करण्याचा निर्णय पेसा ग्रामसभेत घेतला. यासह गावातील इतरही समस्यांचा न्यायनिवाडा केला.
शंभर टक्के आदिवासी असलेल्या काकडयेली या गावाने संपूर्ण दारूविक्री बंदीचा ठराव घेतला आहे. विक्री पूर्णत: बंद राहण्यासाठी महिला व पुरुष आजही प्रयत्नशील आहेत. पण बंदी असतानाही गावातील काही जण लपून-छपून दारूची विक्री करीत असल्याचे महिलांच्या निदर्शनास आले. त्यामुळे अशांवर कठोर कारवाई करण्याबाबत या सभेत चर्चा झाली. हे विक्रेते दारू विकत घेणाऱ्यास हेटी, धानोरा टोला, खरकाडी या गावाहून दारू विकत आणली असे सांगण्यास सांगतात. तर काही जण खरोखर या गावांहून पिऊन येतात. त्यामुळे या गावांमध्ये जाऊन काकडयेलीचा कोणीही माणूस दारू विकत घेण्यासाठी वा पिण्यासाठी आल्यास त्याला दारू विकू नये, असे सांगण्यासंदर्भात कृती करण्याचा निर्णयही ग्रामसभेत झाला.
निवडणुकीत दारूचे आमिष दाखवून लोकांची मते मिळविण्याचा प्रयत्न उमेदवार करतात. त्यामुळे आपले अमूल्य मत दारूच्या चार थेंबांसाठी न विकण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दारूविक्रेत्यांना मदत करणाऱ्या उमेदवारांना सहकार्य न करण्याचा निर्णयही ग्रामसभेत घेण्यात आला. ग्रामसभेला पोलीस पाटील, पेसा ग्रामसभेचे अध्यक्ष, तालुका मुक्तिपथ चमू व नागरिक हजर होते.

Web Title: -And the pirates will be released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.