अगरबत्ती काडीचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 01:41 AM2018-02-21T01:41:50+5:302018-02-21T01:42:10+5:30

कुरखेडा येथील अगरबत्ती काडी प्रकल्पाला मागील तीन महिन्यांपासून बांबूचा पुरवठा करण्यात आला नाही.

Agarbatti kadhi scarcity | अगरबत्ती काडीचा तुटवडा

अगरबत्ती काडीचा तुटवडा

Next
ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : तीन महिन्यांपासून बांबूचा पुरवठा नाही

ऑनलाईन लोकमत
कुरखेडा : कुरखेडा येथील अगरबत्ती काडी प्रकल्पाला मागील तीन महिन्यांपासून बांबूचा पुरवठा करण्यात आला नाही. परिणामी सदर प्रकल्प बंद पडून अगरबत्ती प्रकल्पांना काडी मिळणे अशक्य होणार आहे. त्याचबरोबरील येथील मजुरांवर बेरोजगारीचे संकट कोसळणार असल्याने बांबूचा पुरवठा करावा, अशी मागणी तहसीलदार अजय चरडे यांना दिलेल्या निवेदनातून भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात विविध ठिकाणी अगरबत्ती प्रकल्प निर्माण करण्यात आले आहेत. अगरबत्ती तयार करण्यासाठी बांबूची काडी आवश्यक आहे. काडी तयार करण्यासाठी वन विभागाने कुरखेडा वन परिक्षेत्र कार्यालय परिसरात प्रकल्प तयार केला आहे. बांबूच्या सहाय्याने अगरबत्तीची काडी तयार केली जाते. काडी तयार करण्यासाठी बांबू आवश्यक आहे. मात्र वन विभागाने तीन महिन्यांपासून बांबूचा पुरवठा केला नाही. परिणामी बांबू प्रकल्प अडचणीत आला आहे. अगरबत्ती काडीचे उत्पादन बंद झाल्यास अगरबत्ती प्रकल्प अडचणीत येणार आहे. अगरबत्ती काडी प्रकल्पाच्या माध्यमातून जवळपास १०० मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. जिल्हाभरात जवळपास २०० महिला अगरबत्ती निर्मितीचे काम करीत आहेत. या संपूर्ण मजुरांचा रोजगार हिरावला जाण्याची शक्यता आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे प्रकल्पाला नियमित बांबूचा पुरवठा करावे, अशी मागणी कुरखेडाचे तहसीलदार अजय चरडे यांच्याकडे करण्यात आली आहे. भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष चांगदेव फाये, प्रकल्प पर्यवेक्षक दीपक सोनुले, चव्हाण, सय्यद यांनी निवेदन दिले. निवेदन देऊन चर्चा केली.
मजुरांवर बेरोजगारीचे संकट
बांबूअभावी काडीचा तुटवडा निर्माण झाल्यास काडी प्रकल्पातील तसेच अगरबत्ती प्रकल्पातील शेकडो मजुरांचा रोजगार हिरावला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वन विभागाने या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची मागणी मजुरांनी केली आहे.

Web Title: Agarbatti kadhi scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.