अपर पोलीस महासंचालकांनी केले गडचिरोली कारागृहाचे निरीक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 01:05 AM2018-03-21T01:05:52+5:302018-03-21T01:05:52+5:30

राज्याचे अपर पोलीस महासंचालक तथा महानिरीक्षक, कारागृह व सुधार सेवा डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांनी मंगळवारी गडचिरोली येथील खुल्या कारागृहाला भेट देऊन निरीक्षण केले.

Additional Director General of Police inspected the Gadchiroli jail | अपर पोलीस महासंचालकांनी केले गडचिरोली कारागृहाचे निरीक्षण

अपर पोलीस महासंचालकांनी केले गडचिरोली कारागृहाचे निरीक्षण

Next
ठळक मुद्दे कैद्यांना स्वयंपूर्ण बनविण्यावर भर : कर्मचाऱ्यांसह कैद्यांशी साधला संवाद

ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : राज्याचे अपर पोलीस महासंचालक तथा महानिरीक्षक, कारागृह व सुधार सेवा डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांनी मंगळवारी गडचिरोली येथील खुल्या कारागृहाला भेट देऊन निरीक्षण केले. या कारागृहातील सोयीसुविधा आणि कामकाजाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
दुपारी १२ वाजताच्या सुमारास ते कारागृहात दाखल झाले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख हेसुद्धा त्यांच्यासोबत होते. कारागृहाचे प्रभारी अधीक्षक डी.एस.आडे, निरीक्षक बी.सी.निमगडे यांनी त्यांचे स्वागत केले. या भेटीत डॉ.उपाध्याय यांनी कारागृहातील विविध विभागांना भेटी दिल्या. याशिवात तिथे कैद्यांकडून करवून घेतल्या जाणाºया व्यावसायिक कामांचेही निरीक्षण केले.
यावेळी त्यांच्या हस्ते फित कापून कारागृहातील लाँड्री विभागाचे उद्घाटन करण्यात आले. या लाँड्रीत सध्या फक्त कपड्यांना इस्त्री केली जाणार असून बाहेरील कपडेही इस्त्री करण्यासाठी स्वीकारले जाणार आहेत. विशेष म्हणजे बाहेरील दरापेक्षा कमी दरात येथे कपडे इस्त्री केले जाणार असल्याचे कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या परिसरात कैद्यांकडून केल्या जात असलेल्या शेती कामाची आणि त्यातून घेतल्या जाणाºया उत्पादनांची माहिती कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी दिली. महानिरीक्षकांनी काही कैद्यांशीही संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. याशिवाय कर्मचाºयांनी केलेल्या मागण्याही ऐकून घेतल्या.

Web Title: Additional Director General of Police inspected the Gadchiroli jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस