गडचिरोली जिल्ह्यात अपघात; तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 12:01 PM2019-04-17T12:01:46+5:302019-04-17T12:02:06+5:30

पेरमिली पोलिस स्टेशन अंतर्गत भामरागड मार्गावर तलवाडा व मेडपल्ली दरम्यान वाहतूक करीत असलेल्या ट्रॅक्स व मेटाडोरमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले आहेत.

Accident in Gadchiroli district; Three killed | गडचिरोली जिल्ह्यात अपघात; तीन ठार

गडचिरोली जिल्ह्यात अपघात; तीन ठार

Next

 नीरज चपले
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: पेरमिली पोलिस स्टेशन अंतर्गत भामरागड मार्गावर तलवाडा व मेडपल्ली दरम्यान वाहतूक करीत असलेल्या ट्रॅक्स व मेटाडोरमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले आहेत. ही घटना बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली. या मार्गावरील एक वळणावर ही दोन्ही वाहने समोरासमोर येऊन त्यांची धडक झाली होती. मृतांमध्ये एक पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. या अपघातात ५-६ प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना अहेरीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Accident in Gadchiroli district; Three killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात