५,८४९ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:08 AM2018-02-19T00:08:58+5:302018-02-19T00:09:16+5:30

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यात ८० केंद्रांवर शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी घेण्यात आली. ५ हजार ८४९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

5,84 9 students took the exam | ५,८४९ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

५,८४९ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

Next
ठळक मुद्देजिल्हाभर ८० केंदे्र : पाचवी व आठवीचे विद्यार्थी

ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यात ८० केंद्रांवर शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी घेण्यात आली. ५ हजार ८४९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेत इयत्ता पाचवी व आठवीचे विद्यार्थी सहभागी झाले.
जिल्हाभरातून शिष्यवृत्ती परीक्षेकरिता इयत्ता पाचवीच्या ३ हजार २५७ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केला होता. यापैकी ३ हजार १२८ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला प्रविष्ट झाले. याची टक्केवारी ९६.०३ एवढी आहे. इयत्ता आठवीच्या २ हजार ८६६ विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता अर्ज सादर केला होता. परंतु २ हजार ७२१ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले. याची टक्केवारी ९४.९४ एवढी आहे. गडचिरोली शहरात स्कूल आॅफ स्कॉलर्स, कारमेल स्कूल, वसंत विद्यालय, जिल्हा परिषद हायस्कूल, राणी दुर्गावती विद्यालय, शिवाजी हायस्कूल आदी शाळांमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात आले. जिल्हाभरात विविध ठिकाणी तालुकास्तरावर परीक्षा घेण्यात आली.
आरमोरी - येथील महात्मा गांधी विद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय तसेच तालुक्यात महात्मा फुले विद्यालय देऊळगाव, किसान विद्यालय वडधा, विवेकानंद विद्यालय मानापूर, हितकारणी विद्यालय आरमोरी, महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय आरमोरी, शिवानी विद्यालय वडधा, महाराष्ट्र विद्यालय वैरागड अशा एकूण दहा केंद्रांवर शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इयत्ता पाचवीचे ३२२ पैकी ३१७ व इयत्ता आठवीचे ३१९ पैकी ३१३ असे एकूण ६३० विद्यार्थी सहभागी झाले. गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा यांच्या नियंत्रणात परीक्षा गटसमन्वयक शिक्षण विस्तार अधिकारी गुलाबसिंग राठोड यांनी काम पाहिले.
अहेरी - धर्मराव कृषी विद्यालय व भगवंतराव हायस्कूल या दोन केंद्रावर घेण्यात आली. धर्मराव कृषी विद्यालयातील केंद्रावर इयत्ता पाचवीचे एकूण २०८ पैैकी १८८ व इयत्ता आठवीचे ११६ पैैकी ११२ विद्यार्थी प्रविष्ट झाले. भगवंतराव हायस्कूलच्या केंद्रावर इयत्ता पाचवीचे एकूण १०४ पैैकी १०१ तर इयत्ता आठवीचे ११६ पैकी १०९ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले. दोन्ही केंद्रावर एकूण ४०६ विद्यार्थी सहभागी झाले. तर ३० विद्यार्थी अनुपस्थित होते. बीईओ निर्मला वैद्य यांच्या मार्गदर्शनात केंद्र संचालक म्हणून सुषमा खराबे, गर्गम, राजू नागरे, आत्राम यांनी काम पाहिले.

Web Title: 5,84 9 students took the exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.