केंद्र प्रमुखांसह ५४ शिक्षकांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 10:34 PM2019-01-21T22:34:02+5:302019-01-21T22:34:19+5:30

शालेय पातळीवर विद्यार्थ्यांमध्ये भारतीय राज्यघटनेतील मुल्ये रूजविण्यासाठी राज्य शासन व शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली, आरमोरी, चामोर्शी या तीन तालुक्यातील जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या सर्व शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाची यशस्वीरित्या अंमलबजावणी करणाऱ्या सदर तालुक्यातील केंद्र प्रमुखांसह ५४ शिक्षकांचा प्रमाणपत्र देऊन सोमवारी गौरव करण्यात आला.

54 teachers' pride including the Center Chief | केंद्र प्रमुखांसह ५४ शिक्षकांचा गौरव

केंद्र प्रमुखांसह ५४ शिक्षकांचा गौरव

Next
ठळक मुद्देशांतीलाल मुथ्था फाऊंडेशनचा पुढाकार : मूल्यवर्धन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शालेय पातळीवर विद्यार्थ्यांमध्ये भारतीय राज्यघटनेतील मुल्ये रूजविण्यासाठी राज्य शासन व शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली, आरमोरी, चामोर्शी या तीन तालुक्यातील जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या सर्व शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाची यशस्वीरित्या अंमलबजावणी करणाऱ्या सदर तालुक्यातील केंद्र प्रमुखांसह ५४ शिक्षकांचा प्रमाणपत्र देऊन सोमवारी गौरव करण्यात आला.
स्थानिक जि.प.माध्यमिक शाळेत आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शरदचंद्र पाटील होते. विशेष अतिथी म्हणून शांतीलाल मुथ्था फाऊंडेशन पुणेचे जिल्हाध्यक्ष अशोक संघवी, ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार, प्रा.अनिल जाधव, आरमोरीचे बीडीओ यशवंत मोहितकर आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्टÑ राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद व मुथ्था फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये भारतीय राज्य घटनेतील मूल्य रूजविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. आरमोरी, चामोर्शी, गडचिरोली या तीन तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये केंद्रप्रमुख व शिक्षकांच्या मदतीने मूल्यवर्धनाचा हा उपक्रम राबविण्यात आला. प्रेरक म्हणूून या ५४ शिक्षक व केंद्र प्रमुखांना जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, शांतीलाल मुथ्था यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक यांच्याशी संवाद साधण्यासाठी समग्र शाळा दृष्टिकोन अंगीकारून मूल्यवर्धनाचा कार्यक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ.विजय राठोड म्हणाले, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारीरिक, मानसिक विकासासोबतच त्यांच्यावर सुसंस्कार होणे आवश्यक आहे. यासाठी मुथ्था फाऊंडेशनच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात आलेला उपक्रम स्तुत्य आहे, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना सुसंस्कारित करणारे उपक्रम राबविणाºया अशा संस्थांची गरज आहे, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी सहकार नेते पोरेड्डीवार, फाऊंडेशनचे संघवी यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन चामोर्शीचे तालुका समन्वयक राजन बोरकर यांनी केले. कार्यक्रमाला गडचिरोलीच्या गटशिक्षणाधिकारी संगीता खोब्रागडे, आरमोरीच्या गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा, मूल्यवर्धन उपक्रमाचे तालुका समन्वयक हितेश ठिकरे, रंजना लेंझे आदींसह केंद्रप्रमुख व शिक्षक उपस्थित होते.

Web Title: 54 teachers' pride including the Center Chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.