जिल्हा विकासासाठी ५०० कोटी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:13 AM2019-06-14T00:13:30+5:302019-06-14T00:14:14+5:30

राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करून हा निधी उपलब्ध करून देणार, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खासदार अशोक नेते यांना दिले.

500 crore for district development | जिल्हा विकासासाठी ५०० कोटी देणार

जिल्हा विकासासाठी ५०० कोटी देणार

Next
ठळक मुद्देवित्तमंत्र्यांची ग्वाही : खासदारांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करून हा निधी उपलब्ध करून देणार, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खासदार अशोक नेते यांना दिले.
लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान गडचिरोली जिल्हा विकास व रोजगार निर्मितीसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन ना. मुनगंटीवार यांनी दिले होते. दरम्यान खा. अशोक नेते यांनी १२ जून रोजी चंद्रपूर येथे जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी आश्वासनांची आठवण करून देत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी नेते यांनी केली. यावर गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद आगामी अर्थसंकल्पात करण्यात येईल, अशी कबुली ना. मुनगंटीवार यांनी खा. नेते यांना दिली.
याप्रसंगी माजी आमदार अतुल देशकर, जि.प.चे कृषी सभापती नाना नाकाडे, डॉ. भारत खटी, अरूण हरडे, प्रणय खुणे, साईनाथ साळवे आदी उपस्थित होते.

Web Title: 500 crore for district development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.