चार लाखांच्या खत विक्रीवर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 12:15 AM2017-08-20T00:15:24+5:302017-08-20T00:15:50+5:30

कृषी विभागाच्या अधिकाºयांनी कृषी केंद्रांची तपासणी केली असता, आरमोरी व कुरखेडा तालुक्यातील चार कृषी केंद्रांमध्ये खते व कीटकनाशके विक्रीमध्ये अनियमितता आढळून आली आहे.

4 lakhs ban on sale of fertilizers | चार लाखांच्या खत विक्रीवर बंदी

चार लाखांच्या खत विक्रीवर बंदी

Next
ठळक मुद्देकृषी विभागाची कारवाई : तपासणीत आढळली अनियमितता

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कृषी विभागाच्या अधिकाºयांनी कृषी केंद्रांची तपासणी केली असता, आरमोरी व कुरखेडा तालुक्यातील चार कृषी केंद्रांमध्ये खते व कीटकनाशके विक्रीमध्ये अनियमितता आढळून आली आहे. या कृषी केंद्रांमधील ४ लाख २० हजार रूपये किंमतीच्या खत व कीटकनाशकांच्या विक्रीस कृषी विभागाने बंदी घातली आहे.
कृषी विकास अधिकारी अजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा कृषी अधिकारी शेरेन पठाण यांनी सदर कारवाई केली आहे. कारवाई झालेल्या कृषी केंद्रांमध्ये आरमोरी येथील शेतकरी कृषी केंद्र, कुरखेडा येथील गितेश्वर कृषी केंद्र, रामगड येथील मे. दिनेश कृषी केंद्र, मालेवाडा येथील मे. रॉय कृषी केंद्र या कृषी केंद्रांचा समावेश आहे. कृषी केंद्राची तपासणी केली असता, दर्शनी भागामध्ये खत उपलब्धतेबाबतची माहिती न लावणे, दरपत्रक न लावणे, रासायनिक खत विक्रीचे अहवाल प्राधिकाºयास सादर न करणे आदी त्रूट्या आढळून आल्या. रासायनिक खत नियंत्रण आदेश १९८५ मधील खंड ३५ (१ बी) कीटकनाशक अधिनियम १९६८ खंड २१ (१) (ड) व अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मधील ईसीए ३ (२), सी ३ (२) (१) या तरतूदींचा भंग केला आहे. त्यामुळे सदर कृषी केंद्रचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. कृषी उद्योग खताच्या ४४ बॅग, युरिया खताच्या ३४ बॅग, सिंगल सुफर फास्पेटच्या ३१९ बॅग, कृषी देव खताच्या १२ बॅग, जैविक खताच्या १०० बकेट, कीटकनाशकांमधील ११ प्रकारच्या औषधांना विक्रीबंद आदेश देण्यात आले आहेत.
शेतकºयांनी कोणत्याही खतविक्रेत्याला अधिकची किंमत देऊ नये, जादा दराने विक्री होत असेल तर याबाबतची माहिती तत्काळ तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, गावचे कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी सभापती नाना नाकाडे, कृृषी विकास अधिकारी संजय सूर्यवंशी यांनी केले आहे. या कारवाईमुळे अवैध खत विक्रीला आळा बसणार आहे.

जिल्हाभरातील खत विक्रेत्यांकडे खतांचा मुबलक साठा
जिल्ह्यात रासायनिक खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकºयांनी कोणत्याही खतविक्रेत्याला अधिकची किंमत देण्याची गरज नाही. पॉस मशीनमधून बिल निघत असल्याने बिलावर दर्शविलेली किंमतच खत विक्रेत्याला द्यावी, राष्टÑीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलायझर्स या कंपनीच्या मार्फत ९ आॅगस्ट रोजी २९५ रूपये प्रती बॅग निंबोळीयुक्त युरिया खताचा ९५० मेट्रिक टन पुरवठा झाला आहे. त्यामुळे युरिया खताचीही टंचाई नाही. निंबोळयुक्त युरियामधील नत्र भातपिकास चांगल्या प्रकारे उपलब्ध होत असल्याने उत्पादनात वाढ झाल्याचे सिद्ध झाले आहे. म्हणून निंबोळीयुक्त युरियाचा पुरवठा करण्यात येत आहे. सध्या पावसाळी व ढगाळ वातावरण असल्याने युरियाचा अती वापर टाळावा, नत्राच्या जास्त वापरामुळे रोग, किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. भात पिकास फुटवे फुटण्याच्या किंवा गर्भावस्थेत १९ : १९ : १९ हे फवारणीद्वारे द्याचे खत विक्रेत्यांकडे उपलब्ध झाले आहे. एकरी एक किलो खत वापरल्यास धान पिकास त्याचा फायदा होतो, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

Web Title: 4 lakhs ban on sale of fertilizers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.