सिरोंचातील युवकांकडून १९ लाखांच्या जुन्या नोटा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 10:08 PM2017-11-24T22:08:02+5:302017-11-24T22:08:12+5:30

जुन्या नोटांच्या बदल्यात नवीन नोटा आणण्यासाठी जाणाºया पाच युवकांना तेलंगणा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या जवळील १९ लाख रूपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

19 lakh old notes were seized from the youth of Sironchha | सिरोंचातील युवकांकडून १९ लाखांच्या जुन्या नोटा जप्त

सिरोंचातील युवकांकडून १९ लाखांच्या जुन्या नोटा जप्त

Next
ठळक मुद्देतेलंगणा पोलिसांची कारवाई : पाच जणांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : जुन्या नोटांच्या बदल्यात नवीन नोटा आणण्यासाठी जाणाºया पाच युवकांना तेलंगणा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या जवळील १९ लाख रूपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. सदर कारवाई गेल्या रविवारी तेलंगणा राज्यात करण्यात आलीे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा सिरोंचा येथे कुठून आल्या? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अटक केलेल्या आरोपीमध्ये जमील शेख, शफी शेख, तुलसी गारी तिघेही रा. सिरोंचा व सीताराम नेराला, बालस्वामी रमेश दोघेही रा. तेलंगणा यांचा समावेश आहे. सिरोंचा येथील आरोपींनी तेलंगणातील सिताराम नेराला व बालस्वामी रमेश या दोघांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून १९ लाख रूपयांच्या जुन्या नोटा असून या ऐवजी नवीन नोटा देण्याबाबत करार केला. त्यानंतर हे पाचही युवक जुन्या नोटा घेऊन तेलंगणा राज्यातील पेदामपेठा येथे जात होते. दरम्यान पेदामपेठा येथील पोलीस तपासणी नाक्यावर या पाचही जणांच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने थैलीची चौकशी केली. या थैलीमध्ये १९ लाख रूपयांच्या जुन्या नोटा आढळून आल्या. यामध्ये एक हजार रूपयांच्या एकूण तीन लाखांच्या नोटा व ५०० रूपयांच्या एकूण १६ लाख रूपयांच्या नोटा आढळून आल्या.
नोटबंदी होऊन एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. तरीही सिरोंचा येथे सुमारे १९ लाख रूपयांच्या जुन्या आढळून आल्या. एवढी मोठी रक्कम सिरोंचा येथे आली कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे. सविस्तर चौकशीची मागणी होत आहे.

Web Title: 19 lakh old notes were seized from the youth of Sironchha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.