रेल्वेसाठी १३१ हेक्टर भूसंपादन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:43 AM2018-07-18T00:43:53+5:302018-07-18T00:45:32+5:30

देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील खासगी, शासकीय व वनजमीन अशी एकूण १३१.४३४ हेक्टर जमीन भूसंपादित करावी लागणार आहे.

131 hectares land acquisition for the Railways | रेल्वेसाठी १३१ हेक्टर भूसंपादन होणार

रेल्वेसाठी १३१ हेक्टर भूसंपादन होणार

Next
ठळक मुद्देदेसाईगंज-गडचिरोली नवीन मार्ग : आरमोरी व देसाईगंज तालुक्यातील जमीन

आरिफ शेख।
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील खासगी, शासकीय व वनजमीन अशी एकूण १३१.४३४ हेक्टर जमीन भूसंपादित करावी लागणार आहे.
देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी भूसंपादन करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. या रेल्वे मार्गात देसाईगंज तालुक्यातील तीन गावांमधील २.१६५ हेक्टर आर व आरमोरी तालुक्यातील १२ गावांमधील ५.२७३ हेक्टर आर अशी एकूण ७.४३८ हेक्टर आर शासकीय जमीन लागणार आहे. भूसंपादनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केले आहेत. वनविभागाच्या अखत्यारितील देसाईगंज तालुक्यातील ४.७७ व आरमोरी तालुक्यातील ३८.५२९ हेक्टर आर जमीन रेल्वे मार्गासाठी लागणार आहे.
उपअधीक्षक भूमिअभिलेख व संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबत जमिनीची संयुक्त पूनर्मोजणी झाली आहे. या अहवालानुसार देसाईगंज तालुक्यातील २५.१७७ व आरमोरी तालुक्यातील ५५.५२ अशी एकूण ८०.६९७० हेक्टर आर खासगी जमीन रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादित करावी लागणार आहे.
२५ जानेवारी २०१७ च्या परिच्छेद ४ मध्ये नमूद असलेल्या संबंधित विभागाने केलेल्या संयुक्त मोजणी अहवालानुसार देसाईगंज उपविभागातील खासगी जमीन संपादित करण्याकरिता दुय्यम निबंधक तसेच नगररचनाकार गडचिरोली यांनी ठरवून दिलेल्या दरानुसार जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेल्या दरानुसार सदर गावातील प्रतिहेक्टरी दर यापैकी जे दर जास्त असेल, त्या दरानुसार भूसंपादन केले जाणार आहे. २६ मे २०१५ च्या अनुसूची क्षेत्राच्या वर्गीकरणानुसार दर्शविण्यात आलेल्या घटकाचे गुणांकानुसार जमिनीचा मोबदला निश्चित केला जाणार आहे. संपादन करावयाच्या जमिनीवर घर, विहीर, झाड, विद्युत विभागाचे पोल, टॉवर याबाबतचेही मूल्यांकन करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित शेतकºयाला मोबदला दिला जाणार आहे. ज्या गावांचे मूल्यांकन व अंतिम निवाळा पारित करण्यात आला आहे. ज्या शेतकºयांनी जमीन विक्रीकरिता संमती दर्शविली आहे. त्या जमीन धारकांकडून क्षतीपूर्ती बंदपत्र भरून घेतले जाईल. उपविभागीय अभियंता (बांधकाम) दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर यांचे नावे खासगी जमिनीची रजिस्ट्री केली जाणार आहे.
४०३ पैकी १४४ शेतकऱ्यांची सहमती
रेल्वेसाठी देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील ४०३ खासगी जमीनधारकांची जमीन जाणार आहे. त्यापैकी देसाईगंज तालुक्यातील २८ व आरमोरी तालुक्यातील ११६ अशा एकूण १४४ जमीनधारकांनी जमीन देण्यास सहमती दर्शविली आहे. उर्वरित जमीनधारकांकडून सहमतीपत्र घेण्याचे काम सुरू झाले आहे. या जमीन मालकांना जमीन व त्यावर असलेल्या संसाधनाचा मोबदला म्हणून २८ कोटी ७३ लाख ९१ हजार ६३२ रूपये निश्चित करण्यात आले आहे.

Web Title: 131 hectares land acquisition for the Railways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.