एआयएफएफकडून फिफाला अधिकृत माहितीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 02:21 AM2017-11-02T02:21:51+5:302017-11-02T02:22:00+5:30

Waiting for AIFF's official information | एआयएफएफकडून फिफाला अधिकृत माहितीची प्रतीक्षा

एआयएफएफकडून फिफाला अधिकृत माहितीची प्रतीक्षा

Next

नवी दिल्ली : अ. भा. फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची तिस-यांदा झालेली निवड रद्द ठरविणा-या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाची अधिकृत माहिती एआयएफएफकडून येईपर्यंत आम्ही प्रतिक्रिया देणार नसल्याचे फिफाने म्हटले आहे.
फिफाला याप्रकरणी अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. तोपर्यंत आम्ही अधिक काही सांगू शकत नसल्याचे फिफाच्या प्रवक्त्याने बुधवारी सांगितले. हे प्रकरण महासंघातील गटबाजी अथवा शासकीय हस्तक्षेपाचे नव्हे तर न्यायालयाच्या निकालाचे असल्याने फिफाने सावध भूमिका स्वीकारल्याचे फुटबॉल जाणकारांचे मत आहे.
पटेल यांना गेल्या वर्षी सलग तिसºया कार्यकाळासाठी पुढील ४ वर्षे एआयएफएफ अध्यक्ष निवडण्यात आले. याप्रकरणी राष्टÑीय क्रीडासंहितेचे पालन झाले नाही, असे नमूद करून न्यायालयाने निवड रद्द ठरवली.
माजी नागरी हवाई वाहतूकमंत्री असलेले पटेल हे २००८मध्ये तत्कालीन अध्यक्ष प्रियरंजन दासमुन्शी आजारी पडताच वर्षभरासाठी काळजीवाहू अध्यक्ष बनले. त्यानंतर आॅक्टोबर २००९ आणि डिसेंबर २०१२ मध्ये दोनदा अध्यक्षपदी विराजमान झाले. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये तिसºयांदा त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांच्या देखरेखीत आगामी पाच महिन्यांत महासंघाची नव्याने निवडणूक होणार असून आयएफएफ न्यायालयाच्या विस्तृत आदेशाची प्रत मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. त्यानंतरच पुढील दिशा निश्चित होईल. (वृत्तसंस्था)

फिफाने स्विकारली सावध भूमिका
महासंघातील हे प्रकरण गटबाजी अथवा शासकीय हस्तक्षेपाचे नव्हे तर न्यायालयाच्या निकालाचे असल्याने फिफाने सावध भूमिका स्वीकारल्याचे फुटबॉल जाणकारांचे मत आहे.

Web Title: Waiting for AIFF's official information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.