'Vivo la France' | ‘वीवो ला फ्रान्स’ : विजयानंतर रात्रभर जल्लोष
‘वीवो ला फ्रान्स’ : विजयानंतर रात्रभर जल्लोष

पॅरिस : बेल्जिअमला पराभूत केल्यानंतर फ्रान्सने विश्वचषक अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यानंतर पॅरिसमध्ये पूर्ण रात्रभर जल्लोष करण्यात आला. ‘वीवो ला फ्रान्स’च्या घोषणा देत संघाचे चाहते आनंद व्यक्त करत होते.
पॅरिसवर काल रात्री फुटबॉलची नशा चढली होती. रशियात जेव्हा फ्रान्स विरुद्ध बेल्जिअम सामना सुरू होता. तेव्हाही पॅरिसमधील प्रसिद्ध स्मारक आर्क डे ट्रायोम्फेजवळ हजारोंच्या संख्येने चाहते गोळा झाले होते. २००६ नंतर पहिल्यांदाच फ्रान्सचा संघ अंतिम फेरीत पोहचला, त्यामुळे आनंद साजरा करण्यात आला.
विजयानंतर पॅरिसमध्ये सामूहिक आनंदोत्सव साजरा करण्यात आला. अनेक लोक पथदिव्यांवरदेखील चढले होते. काहींच्या हातात फ्रान्सचा राष्ट्रध्वज होता. कॅफे आणि स्पोर्ट्स बारमध्ये जल्लोष सुरू होता. अनेक फुटबॉल चाहत्यांनी चेहऱ्यांवर राष्ट्रध्वजाचे रंग लावले होते. पॅरिसच्या ऐतिहासिक टाऊन हॉलजवळ मोठ्या स्क्रिनवर सामना पाहण्यासाठी २० हजार फुटबॉलप्रेमी गोळा झाले होते. रस्त्यावर लोक नाचत होते. फ्रान्समध्ये नोव्हेंबर २०१५च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कडक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. टाऊन हॉलमध्ये जवळपास १२०० पोलीस तैनात करण्यात आले होते. (वृत्तसंस्था)

डेश्चॅम्प करू शकतात विक्रम

सेंट पिर्ट्सबर्ग : फ्रान्सने जर रविवारी विश्वचषक अंतिम सामन्यात विजय मिळवला तर प्रशिक्षक दिदियोर डेश्चॅम्प हे खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून विश्वचषक जिंकणारे जगातील तिसरे आणि फ्रान्सचे पहिलेच प्रशिक्षक बनतील. या आधी ही कामगिरी जर्मनीच्या फ्रेंज बॅकनबाऊर आणि ब्राझीलच्या मारियो जगालो यांनी केली आहे.
डेश्चॅम्प १९९८ मध्ये फ्रान्सच्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार होते. त्या सामन्यात फ्रान्सने ब्राझीलला ३ -० ने पराभूत केले होते. डेश्चॅम्प यांच्या नेतृत्वात खेळणाºया झिदानने दोन, तर पेटीट याने अतिरिक्त वेळेत गोल नोंदवला होता. डिफेन्सिव्ह मिडफिल्डर म्हणून खेळणाºया डेश्चॅम्प यांनी बचाव फळी सांभाळत ब्राझीलच्या संघाला गोल करण्यात यश मिळू दिले नव्हते. प्रशिक्षक म्हणून त्यांनी फ्रान्सला विश्वचषक २०१८ च्या अंतिम फेरीत पोहचवले आहे. तर युरो २०१६ च्या अंतिम फेरीतही पोहचवले आहे.

1998 साली फ्रान्सने आपल्याच यजमानपदाखाली झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बलाढ्य ब्राझीलला धक्का देत जगज्जेतेपद पटकावले होते.
2006 साली फ्रान्सने दुसºयांदा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. मात्र, त्यावेळी त्यांना जर्मनीविरुद्ध पराभूत व्हावे लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

किएरन ट्रिपिएर याने पाचव्याच मिनिटाला नोंदवलेल्या शानदार गोलच्या जोरावर इंग्लंडने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात क्रोएशियाविरुद्ध १-० अशी आघाडी घेतली. लुझनिकी स्टेडियमवर दोन्ही संघांनी सावध सुरुवात करत एकमेकांचा अंदाज घेतला.
या महत्त्वपूर्ण सामन्यात इंग्लंडने संघात कोणतेही बदल केले नाही. स्वीडन आणि कोलंबियाविरुद्ध विजयी कामगिरी केलेला संघच क्रोएशियाविरुद्ध खेळविण्यात आला. क्रोएशियाचा कर्णधार लुका मॉडरिचकडून अडथळा झाल्यामुळे ट्रिपिएर पडला आणि रेफ्रीने इंग्लंडला फ्री किक दिली.
पाचव्याच मिनिटाला मिळालेली ही संधी साधताना ट्रिपिएरने चेंडू थेट गोलजाळ्यात मारला आणि इंग्लंडला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर क्रोएशियाने पुनरागमनाचे प्रयत्न करताना आक्रमक चाली रचल्या, पण इंग्लंडचा बचाव भेदण्यात त्यांना यश आले नाही.


Web Title:  'Vivo la France'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.