मैदानावर सिंहासारखे खेळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 03:06 AM2017-07-26T03:06:19+5:302017-07-26T03:06:21+5:30

आॅक्टोबरमध्ये भारतात होणाºया सतरा वर्षांखालील युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघाचा दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे सराव सुरू आहे.

prafull patel taking About football | मैदानावर सिंहासारखे खेळा

मैदानावर सिंहासारखे खेळा

Next

कोल्हापूर : आॅक्टोबरमध्ये भारतात होणाºया सतरा वर्षांखालील युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघाचा दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे सराव सुरू आहे. या ठिकाणी मंगळवारी आॅल इंडिया फुटबॉल फेडरेशन (एआयएफएफ)चे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजे यांनी भेट घेऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
भारतीय संघ मेक्सिको, कोलंबिया, मलेशिया, सिंगापूर आणि थायलंड येथे सराव करण्यासाठी
रवाना होणार आहे. यावेळी
संघाची पटेल व मालोजीराजे यांनी भेट घेऊन सरावाबाबत त्यांची चौकशी केली.
खेळाडूंना शुभेच्छा देताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, तुम्ही सगळे भारतीय संघाचे भविष्य असून संपूर्ण राष्ट्र तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला जिद्द व कष्टाच्या जोरावर सिद्ध करून दाखवायचे आहे. मैदानावर सिंहासारखे खेळा, कोणताही
ताण- तणाव किंवा दबाव न
स्वीकारता खेळा, अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या. या संघात कोल्हापूरच्या अनिकेत जाधवचा समावेश आहे.

Web Title: prafull patel taking About football

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.