मेस्सी, सुआरेजच्या गोलने बार्सिलोना विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 07:14 AM2019-04-08T07:14:02+5:302019-04-08T07:14:12+5:30

ला लीगा फुटबॉल ; अ‍ॅटलेटिको माद्रिदला नमवून केली जेतेपदाकडे कूच

Messi, Suarez's ball Barcelona won | मेस्सी, सुआरेजच्या गोलने बार्सिलोना विजयी

मेस्सी, सुआरेजच्या गोलने बार्सिलोना विजयी

Next

बार्सिलोना : लुईस सुआरेज आणि लियोनेल मेस्सी यांनी दोन मिनिटांच्या अंतरातच केलेल्या दोन गोलच्या बळावर बार्सिलोनाने रविवारी ला लिगा फुटबॉल स्पर्धेत अ‍ॅटलेटिको माद्रीद संघावर २-० असा विजय मिळवला. या शानदार विजयासह बार्सिलोनाने विजेतेपदाकडे भक्कम आगेकूच केली आहे.


मेस्सीसाठी ला लीगामधील हा विक्रमी ३३५ वा विजय आहे, तसेच त्याने आणि सुआरेज यांनी बार्सिलोनासाठी सध्याच्या हंगामात आतापर्यंत ५३ गोल केले आहेत.


सामन्याच्या २८ व्या मिनिटाला अ‍ॅटलेटिको माद्रीदचा खेळाडू डिएगो कोस्टाला रेफरीशी वाद घातल्याने त्याला रेडकार्ड दाखविण्यात आले. तथापि, संघाने १० खेळाडूंसह खेळताना तगड्या बार्सिलोनाला कडवी झुंज दिली. सामना गोलशून्य बरोबरीत सुटणार, अशी चिन्हे दिसत असतानाच ८५ व्या मिनिटाला सुआरेज आणि ८६ व्या मिनिटाला मेस्सीने गोल करीत बार्सिलोनाचा विजय पक्का केला. या विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थानावर काबीज असणारा बार्सिलोनाने दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या अ‍ॅटलेटिको माद्रीदवर ११ गुणांची आघाडी घेतली आहे. तथापि, दोन्ही संघांनी अद्याप सात सामने खेळणे बाकी आहे आणि आता अ‍ॅटलेटिकोसाठी हे अंतर कमी करणे कठीण असेल. (वृत्तसंस्था)

Web Title: Messi, Suarez's ball Barcelona won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.