रोनाल्डो, मेस्सी जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू राहिले नाहीत, 'या' खेळाडूने पटकावला मान 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 10:00 AM2018-12-04T10:00:57+5:302018-12-04T10:04:40+5:30

जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलला दिला जाणाऱ्या बॅलोन डी ओर पुरस्कारावर गेली दहा वर्षे ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांची असलेली मक्तेदारी संपुष्टात आली.

Luka Modric won Ballon d'Or award 2018 | रोनाल्डो, मेस्सी जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू राहिले नाहीत, 'या' खेळाडूने पटकावला मान 

रोनाल्डो, मेस्सी जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू राहिले नाहीत, 'या' खेळाडूने पटकावला मान 

googlenewsNext
ठळक मुद्देख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांची मक्तेदारी संपुष्टातदहा वर्षांनंतर बॅलोन डि,ओर पुरस्कार नव्या खेळाडूच्या हातीक्रोएशियाच्या ल्युका मॉड्रिचने घडवला इतिहास

माद्रिद : जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलला दिला जाणाऱ्या बॅलोन डी ओर पुरस्कारावर गेली दहा वर्षे ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांची असलेली मक्तेदारी संपुष्टात आली. गेली दहा वर्षे रोनाल्डो आणि मेस्सी यांनी आलटून पालटून हा पुरस्कार स्वतःकडे ठेवला होता. मात्र, मंगळवारी या दोन्ही दिग्गज खेळाडूंना क्रोएशिया संघाचा कर्णधार ल्युका मॉड्रिचकडून धक्का बसला. 2018 चा बॅलोन डी ओर पुरस्कारावर मॉड्रिचच्या नावाची मोहोर उमटली. त्याने 277 गुणांच्या फरकाने हा पुरस्कार जिंकला आणि अशी कामगिरी करणारा तो क्रोएशियाचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. ॲडा हिगेर्बर्ग हीच्या रुपात महिलांमध्येही नवीन नाव मिळाले. 



मॉड्रिचने 753 गुणांसह वर्चस्व गाजवले. विशेष म्हणजे रोनाल्डो ( 476) आणि ॲंटोइने ग्रिझमन (414) यांना अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या पुरस्कारासाठी प्रबळ दावेदारांत आघाडीवर असलेल्या कायलिन मॅबाप्पेला 347 गुणांसह चौथ्या स्थानावर रहावे लागले. मेस्सीला केवळ 280 गुण मिळाली. मॉड्रिचसाठी हे वर्ष अविस्मरणीय राहिले. त्याने विश्वचषक स्पर्धेत गोल्डन बॉल, युएफाचा सर्वोत्तम खेळाडू, फिफाचा सर्वोत्तम खेळाडू आणि आता बॅलोन डि ओर अशे पुरस्कार पटकावले. फुटबॉल इतिहासात एकाच वर्षात हे चारही पुरस्कार जिंकणारा मॉड्रिच पहिलाच खेळाडू ठरला. 


मागील दहा वर्षांत रोनाल्डो आणि मेस्सी यांचे वर्चस्व होते. 2007 मध्ये बॅलोन डि ओर जिंकणारा काका हा या दोघांव्यतिरिक्त अखेरचा खेळाडू होता. या कालावधीत दोघांनी प्रत्येकी पाचवेळा हा पुरस्कार नावावर केला. मॉड्रिचच्या नेतृत्वाखाली क्रोएशियाने फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. जेतेपदाच्या सामन्यात फ्रान्सने 4-2 अशा फरकाने क्रोएशियाची स्वप्नवत वाटचाल रोखली.


"हा पुरस्कार स्वीकारतानाच्या भावनांना कोणत्याही शब्दात मांडू शकत नाही. हा अनुभव अत्यंत सुखदायी आहे. याचे श्रेय संपूर्ण संघाला आहे. त्यांच्या सहकार्यामुळे मी चांगली कामगिरी करू शकलो. 2018 वर्ष माझ्यासाठी स्वप्नवत ठरले," अशी प्रतिक्रिया मॉड्रिचने दिली.

Web Title: Luka Modric won Ballon d'Or award 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.