फ्रान्सची नजर दुसऱ्या विश्वविजेतेपदावर, स्टार खेळाडूंवर लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 04:02 AM2018-07-15T04:02:40+5:302018-07-15T04:02:56+5:30

युवा खेळाडूंचा समावेश असलेला फ्रान्स संघ आपल्या स्टार किलियान एमबाप्पे व एंटोइन ग्रिजमान यांच्या कामगिरीच्या जोरावर रविवारी खेळल्या जाणा-या २०१८ विश्वकप फुटबॉल स्पर्धेच्या फायनलमध्ये क्रोएशियाचा पराभव करीत दुस-यांदा हा प्रतिष्ठेचा चषक उंचावण्यास प्रयत्नशील आहे.

The look of France in terms of second world championship, attention to star players | फ्रान्सची नजर दुसऱ्या विश्वविजेतेपदावर, स्टार खेळाडूंवर लक्ष

फ्रान्सची नजर दुसऱ्या विश्वविजेतेपदावर, स्टार खेळाडूंवर लक्ष

Next

मॉस्को : युवा खेळाडूंचा समावेश असलेला फ्रान्स संघ आपल्या स्टार किलियान एमबाप्पे व एंटोइन ग्रिजमान यांच्या कामगिरीच्या जोरावर रविवारी खेळल्या जाणा-या २०१८ विश्वकप फुटबॉल स्पर्धेच्या फायनलमध्ये क्रोएशियाचा पराभव करीत दुस-यांदा हा प्रतिष्ठेचा चषक उंचावण्यास प्रयत्नशील आहे. दरम्यान, चार आठवड्यांपूर्वी ही स्पर्धा सुरू झाली त्यावेळी या अंतिम लढतीची कल्पना मोजक्याच लोकांनी केली असेल.
लियोनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो व नेमार यांच्यासारखे स्टार खेळाडू मायदेशी परतले आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवर पारंपरिक रुपाने बलाढ्य संघ जर्मनी, ब्राझील व अर्जेंटिना या संघांचे आव्हानही अपेक्षेपेक्षा लवकर संपुष्टात आले.
फ्रान्सचा संघ स्पर्धेतील दुसरा सर्वांत युवा संघ आहे. त्यात वेगवान एमबाप्पेची उपस्थिती प्रेरणादायी ठरली आहे. एमबाप्पेचा धडाका रोखण्याचे मुख्य आव्हान क्रोएशियापुढे असेल. एमबाप्पे आणि पॉल पोग्बा या स्टार खेळाडूंच्या वेगवान चाली त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरु शकतात. क्रोएशिया संघ लुका मॉडरिचमुळे प्रेरित आहे. सध्या जगातील सर्वोत्तम मिडफिल्डरमध्ये त्याचा समावेश होतो.
दरम्यान, काही क्रीडा समीक्षक मात्र अंतिम लढत बलाढ्य संघांदरम्यान होत नसल्यामुळे निराश झाले असतील. यात कुठलाही दक्षिण अमेरिकन संघ नाही. स्पेनने २०१० मध्ये नेदरलँडचा पराभव करीत जेतेपद पटकावल्यानंतर दुसºयांदा असे घडले की, ब्राझील, जर्मनी, इटली किंवा अर्जेंटिना यांच्यासारखे बलाढ्य संघ अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात अपयशी ठरले. पण, ही विश्वकप स्पर्धेची अंतिम लढत असून फ्रान्सकडे १९९८ नंतर दुसºयांदा जेतेपद पटकावत अर्जेंटिना व उरुग्वे यांच्या पंक्तीत स्थान मिळवण्याची संधी आहे. यापूर्वी, फ्रान्सने जेतेपद पटकावले होते त्यावेळी डिडिएर डेस्चॅम्प्स संघाचे कर्णधार होते आता ते संघाचे प्रशिक्षक आहेत. त्यामुळे खेळाडू व व्यवस्थापक म्हणून जेतेपद पटकावणारे तिसरे खेळाडू ठरण्याची संधी आहे आणि मारियो जागालो व फ्रांज बॅकेनबॉर यांच्या यादीत स्थान मिळवू शकतात. (वृत्तसंस्था)
क्रोएशियाने गटातील सर्व तिन्ही सामने जिंकले. त्यात अर्जेंटिनाला पराभूत केल्यानंतर डेन्मार्क व रशिया संघांचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला. त्यानंतर उपांत्य फेरीत इंग्लंडवर अतिरिक्त वेळेत मात केली.
ज्लाटको डालिचच्या संघासाठी हा प्रवास आव्हानात्मक होता. आता संघाला पुन्हा एकदा प्रेरणा घेत अंतिम लढतीत सरशी साधावी लागेल.
डालिच म्हणाले,‘आम्ही खडतर प्रवास केला आहे. जीवनातील ही एकमेव संधी आहे. आमच्यासाठी सर्वंच कठीण होते, पण आम्हाला चमकदार कामगिरीचा विश्वास आहे.’
जगातील बरेच चाहते आम्हाला पाठिंबा देतील, असा क्रोएशिया संघाला विश्वास आहे. इव्हान राकितिच म्हणाला,‘लाखो चाहते आमच्या विजयासाठी प्रार्थना करतील.’
फ्रान्सचा निम्मा संघ आता बदलेला आहे, पण एमबाप्पे आपल्या आक्रमक कामगिरीमुळे स्टार झालेला आहे. त्याने अंतिम १६ मध्ये अर्जेंटिनाविरुद्ध ४-३ ने मिळवलेल्या विजयात मैदानावर आक्रमक कामगिरी करीत सर्वांच्या हृदयात स्थान मिळवले. पण, याव्यतिरिक्त फ्रान्सने डेस्चॅम्प्सचा संघ म्हणून शानदार खेळ केला आहे. त्यांचा जोर बचावावर होता.
फ्रान्सने साखळी फेरीत आॅस्ट्रेलिया व पेरू यांचा पराभव केला तर डेन्मार्कविरुद्ध गोलशून्यने बरोबरी राखली. स्पर्धेतील हा एकमेव गोलशून्य अनिर्णीत निकाल ठरला. यानंतर फ्रान्स संघ अर्जेंटिना, उरुग्वे व बेल्जियमविरुद्ध मजबूत भासला. फ्रान्स फायनलमध्ये प्रबळ दावेदार आहे.
ही लढत म्हणून १९९८ च्या उपांत्य लढतीची पृनरावृत्ती आहे. त्यावेळी लिलियान थुर्रामने नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर फ्रान्सने क्रोएशियाचा २-१ ने पराभव केला होता.2006 च्या अंतिम लढतीत त्यांना इटलीकडून पेनल्टीमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. युरो २०१६ च्या अंतिम लढतीत यजमान पोर्तुगालविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर त्यांची भूक आणखी वाढली.
>फ्रान्स
साखळी फेरी
वि.वि. आॅस्टेÑलिया २-१
वि.वि. पुरु १-०
अनिर्णित वि. डेन्मार्क ०-०
उप-उपांत्यपूर्व फेरी
वि.वि. अर्जेंटिना ४-३
उपांत्यपूर्व फेरी
वि.वि. उरुग्वे २-०.
उपांत्य फेरी
वि.वि. बेल्जियम १-०.
>क्रोएशिया
साखळी फेरी...
वि.वि. नायजेरिया २-०
वि.वि. अर्जेंटिना ३-०
वि.वि. आइसलँड २-१
उप-उपांत्यपूर्व फेरी
वि.वि. डेन्मार्क ३-२ (पेनल्टी शूटआऊट)
उपांत्यपूर्व फेरी
वि.वि. रशिया ४-३ (पेनल्टी शूटआऊट्आ)
उपांत्य फेरी
वि.वि. इंग्लंड २-१

Web Title: The look of France in terms of second world championship, attention to star players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.