मेस्सीचा चाहता झाला बेघर; म्हणाला मला तुझ्या घरी घेऊन जा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 04:56 PM2018-12-05T16:56:37+5:302018-12-05T17:02:07+5:30

मुर्तजा अहमादी. हा मेस्सीचा लहानगा चाहता फक्त एका दिवसात प्रकाशझोतात आला होता. कारण 2016 साली त्याने मेस्सीच्या 10 क्रमांकाची प्लॅस्टीकची जर्सी परीधान केली होती.

lionel messi's fan out of house, fan requesting him to take me in your house | मेस्सीचा चाहता झाला बेघर; म्हणाला मला तुझ्या घरी घेऊन जा...

मेस्सीबरोबर त्याचा लहानगा चाहता मुर्तझा.

googlenewsNext
ठळक मुद्देमेस्सीचा एक चाहता बेघर झाला आहे. त्यामुळे त्याने मेस्सीला, मला तुझ्या घरी घेऊन जा, अशी विनंती केली आहे. आता मेस्सी त्याची मदत करणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

नवी दिल्ली : चाहते आपल्या आवडत्या सेलिब्रेटीवर मनापासून प्रेम करतात. त्यामुळे त्या सेलिब्रेटींनी संकटसमयी आपल्यासाठी काही करावं, अशी त्यांची इच्छा असते. अव्वल फुटबॉलपटूलिओनेल मेस्सीच्या बाबतीतही अशीच एक गोष्ट घडली आहे. मेस्सीचा एक चाहता बेघर झाला आहे. त्यामुळे त्याने मेस्सीला, मला तुझ्या घरी घेऊन जा, अशी विनंती केली आहे. आता मेस्सी त्याची मदत करणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 

मुर्तजा अहमादी. हा मेस्सीचा लहानगा चाहता फक्त एका दिवसात प्रकाशझोतात आला होता. कारण 2016 साली त्याने मेस्सीच्या 10 क्रमांकाची प्लॅस्टीकची जर्सी परीधान केली होती. त्यावेळी मेस्सीने त्याच्याबरोबर फोटो काढला आणि मुर्तजा एका रात्रीमध्ये प्रसिद्ध झाला. पण सध्याच्या घडीला मुर्तजा बेघर झाला आहे. कारण तो राहत असलेल्या अफगाणिस्तानमधील जाघोरी जिल्ह्यामध्ये तालिबानांनी हल्ला केला आहे. त्यामुळे मुर्तजाला आपले घर सोडून स्थलांतर करावे लागले आहे.

 

मुर्तजा याबाबत मेस्सीला म्हणाला की, " मला जाघोरी येथील घराची आठवण येत आहे. सध्या मला घराबाहेर पडता येत नाही. फुटबॉल खेळता येत नाही. माझ्याकडे सध्या फुटबॉलही नाही. इथे फक्त गोळीबार आणि बॉम्ब फुटण्याचे आवाज येत आहेत. त्यामुळे मला तुझ्या घरी घेऊन जा."

Web Title: lionel messi's fan out of house, fan requesting him to take me in your house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.