ला लीगा : ख्रिस्तियानो रोनाल्डोची हॅट्ट्रिक..! रेयाल सोसियादादचा ५-२ असा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 11:53 PM2018-02-11T23:53:29+5:302018-02-11T23:53:45+5:30

स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या शानदार हॅट्ट्रिकच्या जोरावर रेयाल माद्रिदने ला लीगा फुटबॉल स्पर्धेत रेयाल सोसियादादचे आव्हान ५-२ असे परतावले. या शानदार विजयानंतर चॅम्पियन्स लीग स्पर्धेत होणाºया पॅरिस सेंट - जर्मन विरुद्धच्या आगामी महत्त्वपूर्ण सामन्यासाठी रेयाल माद्रिदचा आत्मविश्वास उंचावला असेल.

La Liga: Cristiano Ronaldo's hat-trick ..! Real Sociaad 5-2 defeat | ला लीगा : ख्रिस्तियानो रोनाल्डोची हॅट्ट्रिक..! रेयाल सोसियादादचा ५-२ असा पराभव

ला लीगा : ख्रिस्तियानो रोनाल्डोची हॅट्ट्रिक..! रेयाल सोसियादादचा ५-२ असा पराभव

googlenewsNext

माद्रिद : स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या शानदार हॅट्ट्रिकच्या जोरावर रेयाल माद्रिदने ला लीगा फुटबॉल स्पर्धेत रेयाल सोसियादादचे आव्हान ५-२ असे परतावले. या शानदार विजयानंतर चॅम्पियन्स लीग स्पर्धेत होणाºया पॅरिस सेंट - जर्मन विरुद्धच्या आगामी महत्त्वपूर्ण सामन्यासाठी रेयाल माद्रिदचा आत्मविश्वास उंचावला असेल.
पहिल्याच मिनिटाला सँटियागो बेर्नाबेयू याने नोंदवलेल्या वेगवान गोलच्या जोरावर माद्रिदने १-० अशी आघाडी मिळवली होती. यानंतर टोनी क्रुस आणि रोनाल्डोच्या तुफानी हल्ल्याच्या जोरावर माद्रिदने मध्यांतराला ४-० अशी भक्कम आघाडी घेत सामन्याचा निकाल स्पष्ट केला. दुसºया सत्रातही रोनाल्डोने एक गोल करत शानदार हॅट्ट्रिक नोंदवली. रोनाल्डोने २७व्या, ३७व्या आणि ८०व्या मिनिटाला गोल करत पुन्हा एकदा आपला जागतिक दर्जा सिद्ध केला.
याचवेळी, रेयाल माद्रिदला त्यांच्या मध्य बचावफळीच्या कमजोर प्रदर्शनाचाही फटका बसला. याचा अचूक फायदा घेत सोसियादादने ७४व्या आणि ८३व्या मिनिटाला गोल करत पिछाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, माद्रिदने सामन्यावरील आपली पकड सोडली नाही.
गेल्या चार सामन्यांतून रेयाल माद्रिदचा हा तिसरा विजय ठरला. मात्र यानंतरही ला लीगा स्पर्धेच्या गुणतालिकेत अग्रस्थानी असलेल्या एफसी बार्सिलोना संघाहून ते १६ गुणांनी मागे तिसºया स्थानी आहेत.

Web Title: La Liga: Cristiano Ronaldo's hat-trick ..! Real Sociaad 5-2 defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.