आंतरखंडीय फुटबॉल : घरच्या मैदानावर भारताचे लक्ष विजेतेपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 03:23 AM2018-06-10T03:23:29+5:302018-06-10T03:23:29+5:30

सुनील छेत्रीच्या दमदार खेळाच्या जोरावर अंतिम फेरीत केनियावर विजय मिळवण्याचे भारतीय फुटबॉल संघाचे लक्ष्य आहे. आंतरखंडीय फुटबॉल स्पर्धेत भारताला न्यूझीलंडकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला होता.

Intercontinental football Finale Today | आंतरखंडीय फुटबॉल : घरच्या मैदानावर भारताचे लक्ष विजेतेपदावर

आंतरखंडीय फुटबॉल : घरच्या मैदानावर भारताचे लक्ष विजेतेपदावर

Next

मुंबई -  सुनील छेत्रीच्या दमदार खेळाच्या जोरावर अंतिम फेरीत केनियावर विजय मिळवण्याचे भारतीय फुटबॉल संघाचे लक्ष्य आहे. आंतरखंडीय फुटबॉल स्पर्धेत भारताला न्यूझीलंडकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला होता. मात्र तरीही भारतीय संघाने अंतिम फेरीत स्थान पटकावले. संघाला पाठिंबा मिळावा, यासाठी स्टेडिअममध्ये प्रेक्षकांची उपस्थिती असावी, त्यामुळे संघाला चांगला खेळ करण्याची प्रेरणा मिळेल. आयोजकांनी या सामन्यातील सर्व तिकिटे विकली गेल्याचा दावा केला आहे.
गोल करण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या छेत्री याने या स्पर्धेत तिन्ही सामन्यात गोल केले आहे. त्याने त्यात चीनी तैपेई विरोधात हॅट्ट्रिक केली आहे. तर केनिया विरोधातदेखील दोन गोल केले होते. यजमान भारतीय संघ या स्पर्धेकडे एएफसी आशिया चषक स्पर्धेची तयारी म्हणून पाहत आहे. या स्पर्धेत भारताने फायनल जिंकली तर भारतीय संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. भारताने साखळी फेरीत केनियाला ३-० असे पराभूत केले होते. कर्णधार छेत्री याचा देशासाठीचा हा शंभरावा सामना होता. आणि भारतीय कर्णधाराने दोन गोल करत या सामन्याला स्मरणीय बनवले
आता भारतीय संघाचा सामना केनियासोबत होईल. साखळी फेरीत केलेले प्रदर्शन पुन्हा करण्याचा भारतीय संघाचा निश्चय असेल. यजमान संघाने संपूर्ण स्पर्धेत आक्रमक खेळ केला आहे. मात्र स्टिफन कॉन्स्टेनटाईन यांचा संघ केनियाला कमी लेखणार नाही. त्यांनी न्यूझीलंडला २-१ने तर चीनी तैपेईला ४-० ने पराभूत केले आहे. कॉन्स्टेनटाईन त्यांचा सर्वोत्तम संघ उद्याच्या सामन्यात खेळवतील. कारण न्यूझीलंड विरोधातील सामन्यात भारताने सात बदल केले होते. त्यामुळे संघाला १ -२ असा पराभव पत्करावा लागला. सर्वांचे लक्ष छेत्रीकडे असेल. त्याच्या नावावर ६२ आंतरराष्ट्रीय गोल आहेत. त्यात वाढ व्हावी,अशी त्याची इच्छा असेल. छेत्री आणि जेजे हे कोणत्याही मजबूत संरक्षक फळीविरोधात मोठे आव्हान उभे करू शकतात. केनिया संघदेखील वेगळा नाही.

भारतीय संघ पुढीलप्रमाणे

गोलकिपर - गुरप्रीत सिंध संधू, अमरिंदर सिंह, विशाल केथ, डिफेंडर प्रीतम कोटल, अनास एडाथोडिका, सलाम रंजन सिंह, संदेश झिंगान, लालारुथरा, नारायण दास, जेरी लालरिनजुआला, सुभाशिष बोस, मिडफिल्डर - उदांता सिंह, आशिक करुनियान, रॉलिन बोर्जेस, अनिरुद्ध थापा, प्रणय हलधर, मोहम्मद रफीक, हलीचरण नरजारी, लालदानमाविया राल्टे. फॉरवर्ड - सुनील छेत्री, जेजे लालपेखलुआ, बलवंत सिंह आणि एलेन देवरी

केनियाला सहजतेने घेत नाही - कॉन्स्टेनटाईन

मुंबई : भारताने भलेही साखळी फेरीच्या सामन्यात केनियाला ३-० ने पराभूत केले आहे. मात्र मुख्य प्रशिक्षक स्टिफन कॉन्स्टेनटाईन यांनी आज सांगितले त्यामुळे संघाला कोणताही फरक पडत नाही. संघ उद्या इंटरकॉन्टिनेटल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी केनियाच्या संघाला सहजतेने घेत नाही.
केनियाने काल रात्री अखेरच्या साखळी सामन्यात चीनी तैपेईला ४-० ने पराभूत केले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.
कॉन्स्टेनटाईन यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले की,‘आम्ही साखळी फेरीत जो खेळ केला, ती बाब आता मागे पडली आहे. जर तुम्ही चांगला खेळ करत आहात. तर तुम्ही कोणतीही बाब सहजतेने घेऊ शकत नाही.
केनियाने काल चीनी तैपेईला पराभूत केले आहे. आम्ही या सामन्यात मजबूत संघ खेळवू आमच्याकडे दोन सेंट्रल डिफेंडर आहे. संदेश झिंगान आणि अनस इडाथोडिका यांचा संघात समावेश असल्याने आम्हाला मदत मिळेल.’


निश्चित रूपाने अंतिम लक्ष्य स्पर्धेत विजेतेपद मिळवण्याचे आहे. मी युवा खेळाडूंवर विश्वास ठेवतो. मी गेल्या साडेतीन वर्षात तीस खेळाडूंना आतंरराष्ट्रीय पदार्पणाची संधी दिली आहे. ज्यात १५ चांगले खेळाडू आहेत.
- स्टिफन कॉन्स्टेनटाईन

आम्ही विजयाचाच विचार करत आहोत - सेबेस्टियन मिग्ने
मुंबई : केनियाचा फुटबॉल संघ साखळी सामन्यात झालेला पराभवाचा प्रतिशोध घेण्याच्या रणनीतीने खेळणार नाही. कारण साखळी फेरीच्या सामन्यात केनियाला रेफरीच्या चुकीमुळे ०-३ असा पराभव पत्करावा लागला, असे केनियाचे प्रशिक्षक सेबेस्टियन मिग्ने म्हणाले. अंतिम सामन्याच्या आधी अखेरच्या साखळी सामन्यात केनियाने चीनी तैपेईला ४ -० अशी मात दिली.
साखळी सामन्यात भारताने केनियाला ३-० ने पराभूत केले. यासाठी केनियाच्या संघाने रेफ्रीला जबाबदार धरले आहे. मिग्ने यांनी सांगितले की, ‘आम्ही भारताविरोधातील आपल्या सामन्याचे विश्लेषण केले. आणि ०-० स्कोअरपर्यंत आम्ही सामन्यात होतो.

Web Title: Intercontinental football Finale Today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.