भारतीय महिलांची अभिमानास्पद कामगिरी, ऑलिम्पिक पात्रतेच्या दुसऱ्या फेरीत धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 03:17 PM2018-11-14T15:17:44+5:302018-11-14T15:19:00+5:30

भारतीय महिला फुटबॉल संघाने अभिमानास्पद कामगिरी करताना ऑलिम्पिक पात्रतेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

Indian women's football team enters Olympic Qualifiers 2nd round for first time | भारतीय महिलांची अभिमानास्पद कामगिरी, ऑलिम्पिक पात्रतेच्या दुसऱ्या फेरीत धडक

भारतीय महिलांची अभिमानास्पद कामगिरी, ऑलिम्पिक पात्रतेच्या दुसऱ्या फेरीत धडक

Next
ठळक मुद्देभारतीय महिला फुटबॉल संघाची उत्तुंग झेपऑलिम्पिक पात्रतेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेशअखेरच्या सामन्यात म्यानमारकडून 2-1ने पराभूत

मुंबई : भारतीय महिला फुटबॉल संघाने अभिमानास्पद कामगिरी करताना ऑलिम्पिक पात्रतेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. म्यानमार येथे झालेल्या पहिल्या फेरीतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघाला 1-2 अशा फरकाने यजमानांकडून पराभव पत्करावा लागला. तरीही भारताने 'C' गटात दुसरे स्थान पटकावताना पात्रतेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश निश्चित केला. भारताने प्रथमच अशी ऐतिहासिक भरारी घेतली आहे. दुसऱ्या फेरीचे सामने पुढील वर्षी एप्रिल महिन्यात खेळवण्यात येणार आहेत. 



भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 7-1 असा पराभव केला, तर नेपाळविरुद्ध त्यांना 1-1 अशी बरोबरी पत्करावी लागली. अखेरच्या सामन्यात म्यानमारविरुद्धच्या सामन्यात भारताने खाते उघडले. 23 व्या मिनिटाला रतनबाला देवीनं गोल केला. मात्र, म्यानमारच्या वीन थेइंगीने बरोबरीचा गोल केला. त्यानंतर म्यानमारकडून आणखी एक गोल झाला. 


 

Web Title: Indian women's football team enters Olympic Qualifiers 2nd round for first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.