भारतीय फुटबॉल संघ बाद फेरी गाठेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 01:04 AM2018-05-09T01:04:40+5:302018-05-09T01:04:40+5:30

पुढील वर्षी आयोजित होणाऱ्या एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघ बाद फेरी गाठेल, असा विश्वास माजी कर्णधार बायचुंग भुतिया याने व्यक्त केला आहे. भारत आपल्या गटात अव्वल दोन संघात स्थान मिळवेल,असेही भुतियाला वाटते.

 The Indian football team will reach the knockout round | भारतीय फुटबॉल संघ बाद फेरी गाठेल

भारतीय फुटबॉल संघ बाद फेरी गाठेल

Next

नवी दिल्ली  - पुढील वर्षी आयोजित होणाऱ्या एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघ बाद फेरी गाठेल, असा विश्वास माजी कर्णधार बायचुंग भुतिया याने व्यक्त केला आहे. भारत आपल्या गटात अव्वल दोन संघात स्थान मिळवेल,असेही भुतियाला वाटते.
आशिया चषकात भारताचा अ गटात थायलंड, बहरीन आणि यजमान यूएईसोबत समावेश करण्यात आला आहे. बाद फेरीत प्रत्येक गटातील आघाडीचे दोन संघ आणि तिस-या स्थानावर राहणारे सर्वोत्कृष्ट चार संघ सहभागी होणार आहेत. भुतिया म्हणाला, ‘भारताला अ गटात स्थान मिळाल्याने मी फार आनंदी आहे. गटात ‘आशियाई सुपरपॉवर’ इराण, जपान, आॅस्ट्रेलिया आणि कोरिया यांचा समावेश नाही, याबद्दल आम्ही भाग्यवान आहोत.’
ड्रॉच्यावेळी प्रत्येक पॉटमध्ये सहा संघ होते. अ गटात स्थान पटकवून आम्ही २०१८ च्या विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या दिग्गजांकडून बचावलो आहोत. आमचा खेळ आणि थोडी भाग्याची साथ, यामुळे अखेरच्या १६ संघांत स्थान पटकवू शकतो, असा विश्वास देशासाठी शंभराहून अधिक आंतरराष्टÑीय सामने खेळलेल्या भुतियाने व्यक्त केला.
माझ्या मते, आपल्या गटात अव्वल दोन संघात स्थान मिळाल्यास आम्ही उपउपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरू शकतो. हे सोपे नाही, पण अशक्यही नाही. मेहनत आणि भाग्य याची सारखी साथ लाभल्यास हे लक्ष्य गाठृू शकतो, असा विश्वास त्याने एका प्रश्नाच्या उत्तरात व्यक्त केला. (वृत्तसंस्था)

2011मध्ये याच स्पर्धेत भारताला कठीण ड्रॉ मिळाल्याने गुणांची पाटी कोरीच राहिली होती. याबाबत तो म्हणाला, ‘यंदा स्थिती बदलली आहे. विश्वचषकात खेळणारे संघ आमच्या गटात नाहीत. सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या भक्कम व्हावे लागेल. आत्मविश्वासाच्या बळावर आम्ही वाटचाल करू.’ गटातील चार संघांमध्ये भारत रँकिंगमध्ये दुसºया स्थानावर आहे. याचा सकारात्मक परिणाम खेळाडूंच्या मानसिकतेवर पडत असल्याचे भुतियाचे मत आहे.

Web Title:  The Indian football team will reach the knockout round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.