इंटरकॉन्टिनेंटल कप : भारतानेच राखले वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 12:03 AM2018-06-11T00:03:03+5:302018-06-11T00:03:03+5:30

कर्णधार सुनील छेत्रीने नोंदवलेल्या दोन शानदार गोलच्या जोरावर भारताने अंतिम सामन्यात केनियाचा २-० असा पराभव केला. या शानदार विजयासह भारताने चार देशांचा सहभाग असलेल्या इंटरकॉन्टिनेंटल चषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

India win Intercontinental Cup | इंटरकॉन्टिनेंटल कप : भारतानेच राखले वर्चस्व

इंटरकॉन्टिनेंटल कप : भारतानेच राखले वर्चस्व

Next

मुंबई  - कर्णधार सुनील छेत्रीने नोंदवलेल्या दोन शानदार गोलच्या जोरावर भारताने अंतिम सामन्यात केनियाचा २-० असा पराभव केला. या शानदार विजयासह भारताने चार देशांचा सहभाग असलेल्या इंटरकॉन्टिनेंटल चषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
अंधेरी येथील मुंबई फुटबॉल अरेना स्टेडियमवर झालेल्या सामन्यात यजमान भारताचे जेतेपद निश्चित मानले जात होते. पण याआधी अखेरच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या अनपेक्षित पराभवामुळे भारतीयांनी केनियाला गृहीत धरण्याची चूक केली नाही. छेत्रीने भारताला वेगवान सुरुवात करताना आठव्याच मिनिटाला आघाडी मिळवून दिली. यानंतर त्याने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवताना २९व्या मिनिटाला दुसरा गोल करत भारताची आघाडी २-० अशी भक्कम केली.
मध्यंतरापर्यंत भारताने हीच आघाडी कायम राखत वर्चस्व राखले. दुसऱ्या सत्रात भारताने आणखी वेगवान खेळ करत गोल करण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. त्याचवेळी भारतीय बचावपटूंनी अप्रतिम संरक्षण करताना केनियाला अखेरपर्यंत आपल्या गोलक्षेत्रापासून दूर ठेवले. या शानदार जेतेपदासह आगामी २०१९ मध्ये यूएई येथे होणाºया आशिया चषक स्पर्धेसाठी आपण सज्ज असल्याचे भारतीय संघाने सिद्ध केले आहे.

मेस्सीची केली बरोबरी
अंतिम सामन्यात २ गोल नोंदवत छेत्रीने सध्या सक्रिय असलेल्या फुटबॉलपटूंमध्ये देशासाठी सर्वाधिक गोल करण्यामध्ये दुसरे स्थान पटकावले. तसेच, त्याने याबाबतीत अर्जेंटिनाचा स्टार लिओनेल मेस्सी याचीही बरोबरी केली.
या दोन्ही दिग्गज फुटबॉलपटूंच्या नावावर प्रत्येकी ६४ गोलची नोंद झाली आहे. अव्वल स्थानी पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो असून त्याने १५० सामन्यांतून ८१ गोल केले. देशासाठी सर्वाधिक गोल करणाºयांच्या एकूण क्रमवारीत मेस्सी व छेत्री संयुक्तपणे २१व्या स्थानी आहेत.

Web Title: India win Intercontinental Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.