फिफा विश्वचषकाचे आशिया खंडात चौथ्यांदा आयोजन, नायजेरियाला सर्वाधिक विजेतेपदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 03:55 AM2017-09-24T03:55:53+5:302017-09-24T03:56:02+5:30

भारतात ६ आॅक्टोबरपासून सुरू होत असलेल्या १७ वर्षाआतील फिफा विश्वचषक स्पर्धेचे आयोजन आशिया खंडात चौथ्यांदा होत आहे. या स्पर्धेत नायजेरियाने सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे.

FIFA World Cup finals for Asia Cup fourth, Nigeria win most championship | फिफा विश्वचषकाचे आशिया खंडात चौथ्यांदा आयोजन, नायजेरियाला सर्वाधिक विजेतेपदे

फिफा विश्वचषकाचे आशिया खंडात चौथ्यांदा आयोजन, नायजेरियाला सर्वाधिक विजेतेपदे

Next

नवी दिल्ली : भारतात ६ आॅक्टोबरपासून सुरू होत असलेल्या १७ वर्षाआतील फिफा विश्वचषक स्पर्धेचे आयोजन आशिया खंडात चौथ्यांदा होत आहे. या स्पर्धेत नायजेरियाने सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. तर अमेरिका आणि ब्राझीलने या स्पर्धेत सर्वाधिक वेळा सहभाग नोंदवला आहे. भारतात पहिल्यांदाच होणाºया या स्पर्धेसंदर्भातील काही महत्त्वपूर्ण आकडेवारी अशी-

१९८५ ते २००५ पर्यंत या स्पर्धेत १६ संघांचा समावेश होता. २००७ मध्ये संघांची संख्या वाढवून ती २४ करण्यात आली.

अमेरिका व ब्राझील यांनी सर्वाधिक १५ वेळा या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

घाना सलग पाच वेळा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचलेला संघ आहे. मात्र त्यांना १९९१ व १९९५ मध्येच जेतेपद मिळवता आले.

आशिया खंडात सर्वाधिक चार वेळा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी चीन (१९८५), जपान (१९९३), दक्षिण कोरिया (२००७) व सयुंक्त अरब अमिरात (२०१३) मध्ये आयोजन करण्यात आले होते.

नायजेरियाने सर्वाधिक पाच वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. त्यांनी १९८५, १९९३, २००७, २०१३, २१०५ मध्ये जेतेपद, तर तीन वेळा उपविजेतेपद पटकावले. मात्र भारतात होत असलेल्या स्पर्धेत नायजेरिया पात्र ठरू शकला नाही.

भारत अंडर -१७ विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरलेला आशियातील १८ वा संघ आहे.

ब्राझीलने तीन वेळा (१९९७, १९९९, २००३) मध्ये, घाना (१९९१, १९९५) व मेक्सिकोने (२००५, २०११) प्रत्येकी दोन वेळा, तर सोव्हियत संघ (१९८७), सौदी अरब (१९८९), फ्रान्स (२००१) व स्वित्झर्लंड (२००९) यांनी प्रत्येकी एक वेळा जेतेपद पटकावले आहे.

फिफा अंडर १७ मध्ये खेळलेल्या १२ खेळाडूंनी फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आपल्या देशाकडून प्रतिनिधित्व केले.

भारतात होणाºया या स्पर्धेत नायजर, न्यू कालेडोनिया व भारत हे तीन संघ प्रथमच सहभागी होणार आहेत.

ब्राझीलचा रोनाल्डिन्हो हा फिफा अंडर १७ च्या १९९७ व विश्वचषक फुटबॉल २००२ च्या विजेत्या संघातून खेळणारा एकमेव खेळाडू आहे. ्नरोनाल्डिन्होने कारकिर्दीला यातून सुरुवात केली.

Web Title: FIFA World Cup finals for Asia Cup fourth, Nigeria win most championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा