Fifa World Cup 2018: Tattoos of the favorite player in the chest | Fifa football World Cup 2018 : जबरा फॅन : छातीवर गोंदवला आवडत्या खेळाडूचा टॅटू 
Fifa football World Cup 2018 : जबरा फॅन : छातीवर गोंदवला आवडत्या खेळाडूचा टॅटू 

मुंबई - फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा ज्वर चांगलाच चढू लागला आहे. इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यात उपांत्य फेरीचा सामना आज ( बुधवारी ) होणार आहे. आपापल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी चाहतेही जोर लावत आहेत. आपल्या आवडत्या खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी हे चारते कोणत्याही थराला जाण्याची तयारी राखतात. एका चाहत्याने तर चक्क इंग्लंडचा बचावपटू हॅरी मॅग्वार याच्या चेह-याचा टॅटू आपल्या छातीवर गोंदवला आहे. स्वीडन विरूद्धच्या लढतीत मॅग्वारने गोल केल्यास आपण त्याचा टॅटू छातीवर गोंदवू असा शब्द मॅट बॅटन नावाच्या  चाहत्याने  दिला होता आणि त्या सामन्याच्या 30व्या मिनिटाला मॅग्वारने गोल केला आणि शब्दाला जागून त्याने छातीवर टॅटू काढला. त्याने त्वरित टॅटू काढल्याचे छायाचित्र ट्विटरवर टाकले. मॅग्वारनेही त्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली की, आपल्याला या गोष्टीवर विश्वास बसत नाही. स्पर्धेनंतर मॅटला माझी स्वाक्षरी असलेले टी-शर्ट देईन. 


 

English summary :
England and Croatia Semi final: The fever of the FIFA World Cup tournament is on. The semi-finals between England and Croatia will be played today on 11 july 2017(Wednesday).


Web Title: Fifa World Cup 2018: Tattoos of the favorite player in the chest
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.