FIFA World Cup 2018 Semi Final Belgium Vs France Live Updates : France looking strong than Belgium in semifinals | Belgium Vs France Live Updates : फ्रान्स दिमाखदारपणे अंतिम फेरीत दाखल
Belgium Vs France Live Updates : फ्रान्स दिमाखदारपणे अंतिम फेरीत दाखल

ठळक मुद्देफ्रान्स आणि बेल्जियम हे दोन्ही संघ जोरदार आक्रमणासाठी ओळखले जातात.

फ्रान्स दिमाखदारपणे अंतिम फेरीत दाखल

सॅम्युअल उम्मिटीेने केलेल्या एकमेव गोलच्या जोरावर फ्रान्सने उपांत्य फेरीत बेल्जियमवर 1-0 असा विजय मिळवला आणि अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. पहिल्या सत्रात दोन्ही संघांनाही गोल करता आला नव्हता. पण दुसऱ्या सत्राच्या सहाव्या मिनिटाला उम्मिटीेने निर्णायक गोल करत फ्रान्सला अंतिम फेरीत पोहोचण्यात मोलाची भूमिका बजावली. फ्रान्सचा गोलरक्षक लॉरीसने या सामन्यात अभेद्य बचाव केला. लॉरीसच्या बचावाने बेल्जियमचे आक्रमण निष्प्रभ केले. बेल्जियमच्या लुकाकु आणि फॅलिनी या आक्रमणपटूंना यावेळी लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. लुकाकुने या सामन्यात बऱ्याच संधी सोडल्या आणि त्याचाच फटका बेल्जियमला बसला.

- फ्रान्स अंतिम फेरीत दाखल 

- निर्धारीत वेळेत फ्रान्सकडे 1-0 अशी आघाडी कायम

- बेल्जियमच्या आक्रमणाला फ्रान्सचे चोख उत्तर

- बेल्जियमच्या फेनानीने 65 व्या मिनिटाला गोलसंधी गमावली

-  फ्रान्सचा पहिला गोल कसा झाला, पाहा हे फोटो 

- फ्रान्सचा पहिला गोल; सॅम्युअल उम्मिटीेने 51व्या मिनिटाला खाते उघडले 

पहिल्या सत्रात गोलशून्य बरोबरी

सेंट पिटर्सबर्ग : सामन्याच्या सुरुवातीला फ्रान्सने चांगले आक्रमण केले असले तरी त्यानंतर बेल्जियमने चेंडूवर ताबा मिळवला. पण पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात मात्र अपयश आले. बेल्जियमने पहिल्या सत्रात 60 टक्के चेंडूवर ताबा मिळवला आणि फ्रान्सच्या गोलपोस्टवर एकदा हल्ला केला, पण गोल करण्यात ते यशस्वी ठरले नाही. फ्रान्सने  दोनवेळा बेल्जियमच्या गोलपोस्टवर हल्ले केले, पण गोल करण्यात ते अपयशी ठरले.

  

- फ्रान्सला 44व्या मिनिटाला फ्री-किक

- फ्रान्सचा गोलरक्षक लॉरीसचा अप्रतिम बचाव, पाहा हे ट्विट 

- फ्रान्सच्या जिरुडने गोल करण्याची संधी गमावली

- बेल्जियमची आक्रमणासह सकारात्मक सुरुवात 

- फ्रान्सचा गोलरक्षक लॉरिसने 22व्या मिनिटाला अप्रतिमपणे गोल वाचवला

- फ्रान्स 20व्या मिनिटाला स्वयंगोल होण्यापासून वाचला

- सामन्याच्या सोळाव्या मिनिटाला बेल्जियमच्या हझार्डची गोल संधी हुकली

- बेल्जियमचे किंग फिलीप आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन एकत्रपणे सामना पाहत आहेत

- सामन्याच्या तेराव्या मिनिटाला एमबापेची गोल करण्याची संधी हुकली

- बेल्जियमला मिळाला सामन्याच्या पहिला कॉर्नर

- पहिल्या मिनिटापासून फ्रान्सचे आक्रमण

सेंट पिटर्सबर्ग : आतापर्यंत दमदार कामगिरी करत फ्रान्स आणि बेल्जियम हे दोन्ही संघ फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत. या सामन्यात बेल्जियमपेक्षा फ्रान्सचे पारडे जड समजले जात आहे. पण तरीही पहिल्या उपांत्य फेरीत फ्रान्स बाजी मारणार की बेल्जियम याची उत्सुकता साऱ्यांना लागली आहे.

फ्रान्स आणि बेल्जियम हे दोन्ही संघ जोरदार आक्रमणासाठी ओळखले जातात. पण या दोघांपैकी कोणत्या संघाचे आक्रमण अधिक धारदार होईल आणि कोणता संघ अंतिम फेरीत पोहोचेल, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

ही पाहा दोन्ही संघांची रणनीती


असे असतील दोन्ही संघWeb Title: FIFA World Cup 2018 Semi Final Belgium Vs France Live Updates : France looking strong than Belgium in semifinals
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.