‘फिफा’च्या सामन्याला विक्रमी गर्दी, ३८ हजार प्रेक्षकांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 02:31 AM2017-10-27T02:31:27+5:302017-10-27T02:31:36+5:30

नवी मुंबई : जागतिक फुटबॉल महासंघाच्या (फिफा) १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचे आठ सामने नेरुळ येथील डी. वाय. पाटील स्टेडिअम येथे पार पडले.

A FIFA match is set for a record crowd, 38 thousand viewers attend | ‘फिफा’च्या सामन्याला विक्रमी गर्दी, ३८ हजार प्रेक्षकांची उपस्थिती

‘फिफा’च्या सामन्याला विक्रमी गर्दी, ३८ हजार प्रेक्षकांची उपस्थिती

Next

प्राची सोनवणे
नवी मुंबई : जागतिक फुटबॉल महासंघाच्या (फिफा) १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचे आठ सामने नेरुळ येथील डी. वाय. पाटील स्टेडिअम येथे पार पडले. या सामन्यांना नवी मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, फुटबॉलप्रेमींनी या आठही सामन्यांना मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्याला विक्रमी गर्दी झाली होती. बुधवारी झालेल्या माली विरुद्ध स्पेन या सामन्याला ३७ हजार ८४७ फुटबॉलप्रेमी उपस्थित होते.
फुटबॉलच्या या स्पर्धा सुरळीत पार पडाव्यात यासाठी नवी मुंबई पोलिसांसह विविध सुरक्षा यंत्रणांनी मुख्य सुरक्षा योजना आणि आपत्कालीन सुरक्षा योजना तयार करण्यात आली होती. त्यानुसार नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअम आणि आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात होती. फुटबॉलच्या मॅचेसदरम्यान गर्दी नियंत्रण व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस, दंगा काबू पथके (आरसीपी), राज्य राखीव पोलीस बल (एसआरएफ), स्टीवर्ड्स (फिफा विशेष प्रशिक्षित पोलीस) आदी पथके नेमण्यात आली होती. यांच्या माध्यमातून याठिकाणी कसलाही गैरप्रकार झाला नसून सर्वच सामने सुरळीतपणे पार पडले.
आपत्कालीन परिस्थितीत सशस्त्र मुकाबला करण्यासाठी स्थानिक हत्यारी पोलीस, जलद प्रतिसाद पथक (क्यूआरटी), फोर्स वन कमांडो, एस.पी.जी. कमांडोसह इतरही विशेष प्रशिक्षित शस्त्रसज्ज पथके कार्यरत ठेवण्यात आली होती. तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अग्निशमन दल, विशेष सुसज्ज आरोग्य पथके देखील कार्यरत करण्यात होती. त्याशिवाय संपूर्ण स्टेडिअमच्या परिसरामध्ये उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, याठिकाणी प्रत्येक संशयित हालचालींवर करडी नजर ठेवली जात होती.
स्वयंसेवकांची चोख भूमिका
डी.वाय. पाटील महाविद्यालयाच्या विविध विभागातील विद्यार्थ्यांनी याठिकाणी येणाºया प्रेक्षकांच्या मदतीसाठी स्वयंसेवकाची भूमिका अत्यंत चोखपणे पार पाडली. यामध्ये विविध शाखेचे जवळपास दोनशे विद्यार्थी कार्यरत होते.
प्रेक्षकांना नियम आणि अटींविषयी माहिती देणे, सुरक्षेविषयी जनजागृती करणे, स्वच्छतेविषयी सूचना देणे, इतर राज्यातून तसेच परदेशातून आलेल्या फुटबॉलप्रेमींना स्टेडिअमकडे जाणारा अचूक मार्ग दाखविणे आदी भूमिका या स्वयंसेवकांकडून पार पाडण्यात आल्या.
महापालिकेने केलेल्या उपाययोजना
फिफा जागृतीसाठी आयोजित वॉकेथॉनमध्ये ४२ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
फिफाच्या सराव सामन्यांसाठी यशवंतराव चव्हाण मैदानाची निर्मिती.
यशवंतराव चव्हाण मैदानासाठी इटलीवरून मागविले विद्युत साहित्य.
सायन - पनवेल महामार्गाचे सुशोभीकरण व दुरुस्ती
फिफा सामन्यांसाठी चार ठिकाणी सविस्तर वाहनतळ
प्रेक्षकांना ये - जा करण्यासाठी एनएमएमटी बसेसची सुविधा
शहरातील भिंती व उड्डाणपुलांची रंगरंगोटी
फिफा सामन्यांच्या प्रसिद्धीसाठी सर्व प्रमुख रोडवर जाहिरात
फिफा व स्मार्ट नवी मुंबईची माहिती देण्यासाठी विशेष लघुचित्रपट
महापौर सुधाकर सोनावणे व आयुक्त रामास्वामी एन. यांच्यासह सर्वांनीच घेतले परिश्रम
पोलिसांनी केलेल्या उपाययोजना
फिफाचे आठही सामने शांततेमध्ये पार पाडण्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था
वाहतूूककोंडीशिवाय सर्व सामने पार पाडण्यात यश
स्टेडिअम व बाहेरही कडक बंदोबस्त
फिफाच्या तीन महिने अगोदर महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा
सामन्यांच्या दरम्यान अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्हीचीही मदत
फिफासाठी जवळपास १२०० अधिकारी, कर्मचाºयांनी घेतली मेहनत
पोलीस आयुक्त हेमंत नगराळे व सर्व अधिकाºयांचे परिश्रम
>डी.वाय. पाटील व्यवस्थापनाने केलेल्या उपाययोजना
फिफा सामन्यांदरम्यान स्टेडिअममधील आसनव्यवस्थेपासून सर्व सुविधांमध्ये बदल
मैदानामधील जल्लोषाचा त्रास स्टेडिअमबाहेरील कोणालाही होणार नाही याची दक्षता
पावसाचा फटका बसू नये यासाठी अत्याधुनिक ड्रेनेज व्यवस्था
महानगरपालिकेच्या
माध्यमातून जनजागृती
महापालिकेच्या माध्यमातून शहरातील रस्त्यांचे सुशोभीकरण, स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली होती. सामने पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपºयातून आलेल्या प्रेक्षकांना नवी मुंबईच्या सौंदर्याने भुरळ घातली.
वाहतूक सुरळीत
सामने पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता महापे-शिळफाटा मार्गे नवी मुंबईकडे येणाºया अवजड वाहनांना प्रवेशबंदी घोषित करण्यात आली होती. तसेच याठिकाणी पर्यायी मार्गाची देखील व्यवस्था करण्यात आली होती. फिफाच्या आठही सामन्यांदरम्यान वाहतूक विभागाच्या वतीने चोख भूमिका बजावित प्रवाशांना वाहतूककोंडीच्या समस्यांचा सामना करावा लागणार नाही याची पुरेपूर दखल घेण्यात आली. स्टेडिअम परिसराला जोडणाºया सर्वच मार्गांवर वाहतूक पोलीस कार्यरत होते आणि सामन्यांदरम्यान वाहतुकीच्या अडचणी न उद्भविल्याचेही वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त नितीन पवार यांनी स्पष्ट केले.
>प्रेक्षकांची उपस्थिती
दिनांक सामने उपस्थिती
६ आॅक्टोबर न्यूझिलंड विरुद्ध टर्की २२ हजार
६ आॅक्टोबर पेराग्वे विरुद्ध माली २२ हजार
९ आॅक्टोबर टर्की विरुद्ध माली २५ हजार
९ आॅक्टोबर पेराग्वे विरुद्ध न्यूझिलंड २५ हजार
१२ आॅक्टोबर टर्की विरुद्ध पेराग्वे २२ हजार
१२ आॅक्टोबर अमेरिका विरुद्ध कोलंबिया २२ हजार
१८ आॅक्टोबर ग्रुप ए मॅच ४२ ३० हजार
२५ आॅक्टोबर सेमी फायनल ३८ हजार
>डी.वाय. पाटील स्टेडिअमचे कौतुक
डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी क्रीडा क्षेत्रातील योगदानाबाबत सर्वत्र कौतुक केले जात असून विश्वचषक स्पर्धेसाठी परदेशातून येणाºया खेळाडूंकरिता ड्रेसिंग रुम, आधुनिक सोयी-सुविधा, स्टेडिअममधील आसनव्यवस्था, अत्याधुनिक यंत्रणा, खेळाडूंकरिता आवश्यक साहित्य, सुरक्षेची जबाबदारी आदी सर्वच गोष्टींची पुरेपूर काळजी घेण्यात आली होती. या माध्यमातून नवी मुंबईकरांना पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती, तसेच याठिकाणी आवडत्या फुटबॉलपटूला प्रत्यक्ष खेळताना पाहता आले. फिफाच्या सामन्यातून स्टेडिअमचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित करण्यात आला.

Web Title: A FIFA match is set for a record crowd, 38 thousand viewers attend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.