FIFA Football World Cup 2018 : शूटआऊटची रस्सीखेच रशियानं जिंकली; स्पेन स्पर्धेतून आऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2018 10:17 PM2018-07-01T22:17:02+5:302018-07-01T22:21:39+5:30

मॉस्को - यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील पहिल्या पेनल्टी शूटआऊट लढतीत यजमान रशियाने 4-3 (1-1) अशा फरकाने माजी विजेत्या स्पेनवर विजय मिळवला. पहिल्या सत्राचा खेळ वगळता संपूर्ण लढतीत रटाळ खेळ झाला. दोन्ही संघानी बचावात्मक खेळावरच भर दिला होता. कोके आणि आयगो अस्पास यांचे पेनल्टी शूटआऊट वरील प्रयत्न रशियाच्या गोलीने अप्रतिमरित्या रोखून माजीविजेत्या स्पेनला स्पर्धेबाहेर केले.

FIFA Football World Cup 2018: Russia won; Spain Out | FIFA Football World Cup 2018 : शूटआऊटची रस्सीखेच रशियानं जिंकली; स्पेन स्पर्धेतून आऊट

FIFA Football World Cup 2018 : शूटआऊटची रस्सीखेच रशियानं जिंकली; स्पेन स्पर्धेतून आऊट

Next

 मॉस्को - यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील पहिल्या पेनल्टी शूटआऊट लढतीत यजमान रशियाने 4-3 (1-1) अशा फरकाने माजी विजेत्या स्पेनवर विजय मिळवला. पहिल्या सत्राचा खेळ वगळता संपूर्ण लढतीत रटाळ खेळ झाला. दोन्ही संघानी बचावात्मक खेळावरच भर दिला होता. कोके आणि आयगो अस्पास यांचे पेनल्टी शूटआऊट वरील प्रयत्न रशियाच्या गोलीने अप्रतिमरित्या रोखून माजीविजेत्या स्पेनला स्पर्धेबाहेर केले.

ॲर्टेम डियूबाने ४१ व्या मिनिटाला गोल करून विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत यजमान रशियाला पहिल्या सत्रात स्पेनविरुद्ध १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. सेर्गेई  इग्नाशेव्हीचच्या स्वयंगोलच्या जोरावर स्पेनने खाते उघडले, मात्र त्यांना 1-0 अशी आघाडी कायम राखता आली नाही. डियूबाने पेनल्टी स्पॉट किकवर बरोबरीचा गोल केला. 

मंध्यंतरानंतर स्पेनने बचावात्मक खेळासोबत आक्रमणात किंचितशी वाढ केली. मात्र दोन्ही संघांनी बचावावर भर ठेवल्यामुळे सामन्यातील जिवंतपणा हरवला होता. दुस-या सत्रातही बरोबरीची कोंडी कायम राहीली. स्पेनपेक्षा यजमानांनी अधिक बचावात्मक खेळ केला. 

अतिरिक्त 30 मिनिटांचे पहिले सत्रही कंटाळवाणे ठरले. 109व्या मिनिटाला रशियाचा गोलरक्षक इगोर अॅकिंफीव्हने स्पेनचा गोलप्रयत्न सफाईने रोखला. तो एक प्रयत्न सोडल्यास ही तीस मिनिटे कंटाळवाणी ठरली. 

Web Title: FIFA Football World Cup 2018: Russia won; Spain Out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.