FIFA Football World Cup 2018: The record can do dashchamps | FIFA Football World Cup 2018 : डेश्चॅम्प करू शकतात हा विक्रम
FIFA Football World Cup 2018 : डेश्चॅम्प करू शकतात हा विक्रम

ठळक मुद्दे फ्रान्सने जर रविवारी विश्वचषक अंतिम सामन्यात विजय मिळवला तर प्रशिक्षक दिदियोर डेश्चॅम्प हे खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून विश्वचषक जिंकणारे जगातील तिसरे आणि फ्रान्सचे पहिलेच प्रशिक्षक बनतील.

सेंट पिर्ट्सबर्ग : फ्रान्सने जर रविवारी विश्वचषक अंतिम सामन्यात विजय मिळवला तर प्रशिक्षक दिदियोर डेश्चॅम्प हे खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून विश्वचषक जिंकणारे जगातील तिसरे आणि फ्रान्सचे पहिलेच प्रशिक्षक बनतील. या आधी ही कामगिरी जर्मनीच्या फ्रेंज बॅकनबाऊर आणि ब्राझीलच्या मारियो जगालो यांनी केली आहे.

डेश्चॅम्प १९९८ मध्ये फ्रान्सच्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार होते. त्या सामन्यात फ्रान्सने ब्राझीलला ३ -० ने पराभूत केले होते. डेश्चॅम्प यांच्या नेतृत्वात खेळणाºया झिदानने दोन तर पेटीट याने अतिरिक्त वेळेत गोल नोंदवला होता. डिफेन्सिव्ह मिडफिल्डर म्हणून खेळणाऱ्या डेश्चॅम्प यांनी बचाव फळी सांभाळत ब्राझीलच्या संघाला गोल करण्यात यश मिळू दिले नव्हते. प्रशिक्षक म्हणून त्यांनी फ्रान्सला विश्वचषक २०१८ च्या अंतिम फेरीत पोहचवले आहे. तर युरो २०१६ च्या अंतिम फेरीतही पोहचवले आहे.

तीन विश्वचषक खेळलेल्या जर्मनीच्या फ्रेंज बॅकनबाऊर यांनी १९७४ मध्ये पश्चिम जर्मनीचे नेतृत्व करताना विश्वचषक जिंकून दिला होता. तसेच संघाचे व्यवस्थापक म्हणून देखील त्यांनी १९९० मध्ये हा चषक उंचावला होता.  त्या वेळी जर्मनीने अर्जेंटिनाला १-० ने पराभूत केले होते. ब्राझीलचे मारियो जगालो हे खेळाडू म्हणून आणि प्रशिक्षक म्हणून विश्वचषक जिंकून देणारे जगातील पहिलेच आहे.  त्यांनी १९५८ आणि १९६२ मध्ये खेळाडू णून विश्वचषक मिळवला होता. तर १९७० मध्ये व्यवस्थापक आणि १९९४ मध्ये सहायक व्यवस्थापक म्हणून संघ विजयात मोलाचा वाटा उचलला होता. झीलच्या पाच विश्वचषक विजयांपैकी चार विजयात त्यांचा वाटा राहिला आहे.


Web Title: FIFA Football World Cup 2018: The record can do dashchamps
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.