FIFA Football World Cup 2018 : इंग्लंडचा विक्रमी हॅरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2018 10:47 PM2018-06-24T22:47:32+5:302018-06-24T22:48:28+5:30

इंग्लंडबरोबरच विजयात चमकला तो त्यांचा कर्णधार हॅरी केन.केनने एकाच सामन्यात विक्रमांची यादी आपल्या नावे केली म्हणून त्याला विक्रमी हॅरी म्हणता येईल.

FIFA Football World Cup 2018: England's record maker Harry Harry! | FIFA Football World Cup 2018 : इंग्लंडचा विक्रमी हॅरी!

FIFA Football World Cup 2018 : इंग्लंडचा विक्रमी हॅरी!

Next
ठळक मुद्देयंदाच्या विश्वचषकात हॅट्ट्रिक नोंदवणारा तो इंग्लंडचा पहिलाच खेळाडू.

सचिन कोरडे :  पनामाविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडने सोमवारी गोलचा ‘षटकार’ ठोकला. विश्वचषकात इंग्लंडची ही ऐतिहासिक कामगिरी आहे. कारण आतापर्यंत एवढ्या मोठ्या फरकाने इंग्लंड कधीच जिंकला नव्हता. इंग्लंडबरोबरच विजयात चमकला तो त्यांचा कर्णधार हॅरी केन.केनने एकाच सामन्यात विक्रमांची यादी आपल्या नावे केली म्हणून त्याला विक्रमी हॅरी म्हणता येईल. यंदाच्या विश्वचषकात हॅट्ट्रिक नोंदवणारा तो इंग्लंडचा पहिलाच खेळाडू. पदार्पणात एक कर्णधार म्हणून पहिल्या हाफमध्ये पाच गोलचा धमाका करणारही तो एकमेवच आहे. 

१) यंदा सर्वाधिक गोल नोंदवण्याच्या यादीत पहिल्या क्रमांकावर. ख्रिस्तियानो रोनाल्डो, लुकाकू पिछाडीवर. 

२) फुटबॉलच्या इतिहासात इंग्लंडचा हा सर्वात मोठा विजय. डेन्मार्क विरुद्ध २००२ मध्ये इग्लंडने ३-० ने सर्वात मोठा विजय नोंदवला होता.

३) इंग्लंडने १९६६ नंतर पहिल्यांदाच चार व त्यापेक्षा अधिक गोल नोंदवले. याआधी, त्यांनी जर्मनीविरुद्ध ४-२ ने विजय मिळवला होता. 

४)  पहिल्या हाफमध्ये पाच गोल नोंदण्याची घटना विश्वचषक इतिहासात पाचव्यांदा घडली. २०१४ मध्ये उपांत्य फेरीत जर्मनीने ब्राझीलविरुद्धच्या सामना ७-१ ने जिंकला होता. 

५) विश्वचषकाच्या इतिहासात १९८६ मध्ये गॅरी  लिनेकर याने इंग्लडकडून पहिली हॅट्ट्रिक नोंदवली होती.त्यानंतर हॅट्ट्रिक नोंदवणारा हॅरी पहिला इंग्लिश खेळाडू आहे.

Web Title: FIFA Football World Cup 2018: England's record maker Harry Harry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.