किंग्स चषक फुटबॉलसाठी ३७ संभाव्य खेळाडू जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 01:50 AM2019-05-17T01:50:52+5:302019-05-17T01:51:03+5:30

भारतीय संघाचे शिबिर नवी दिल्लीत २० मेपासून सुरू होणार आहे.विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी जखमी स्ट्रायकर जेजे लालपेखलुआ याच्यासह पाच खेळाडूंना विश्रांती देण्यात आली.

 Declared 37 potential players for the Kings Cup football | किंग्स चषक फुटबॉलसाठी ३७ संभाव्य खेळाडू जाहीर

किंग्स चषक फुटबॉलसाठी ३७ संभाव्य खेळाडू जाहीर

Next

नवी दिल्ली: पुढील महिन्यात थायलंडमध्ये आयोजित किंग्स चषक फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱ्या भारतीय संघातील ३७ संभाव्य खेळाडूंची घोषणा नवे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमाच यांनी गुरुवारी केली. भारतीय संघाचे शिबिर नवी दिल्लीत २० मेपासून सुरू होणार आहे.विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी जखमी स्ट्रायकर जेजे लालपेखलुआ याच्यासह पाच खेळाडूंना विश्रांती देण्यात आली.
जेजे गुडघ्याच्या दुखापतीमुळे बुधवारी चेन्नईयन एफसीसाठी एएफसी चषकाचा सामना देखील खेळला नव्हता. मेच्या तिसºया आठवड्यात त्याच्या जखमेवर शस्त्रक्रिया केली जाईल. जेजेशिवाय हुलिचरण नरजारी याच्या गुडघ्याला दुखापत आहे. मंदार देसाईच्या मांसपेशी ताणल्या गेल्या, तर आशिक कुरियन व नरेंदर गहलोत यांच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे.
स्टिमाच यांनी हीरो आयलीग व आयएसएलमधील भारतीय खेळाडूंची कामगिरी पाहून संभाव्य खेळाडूंना राष्ट्रीअ शिबिरासाठी पाचारण करण्यात आले. किंग्स चषकानंतर जुलैमध्ये आंतर कॉन्टिनेंटल चषक स्पर्धेचे आयोजन होईल.
किंग्स चषक फुटबॉल स्पर्धा ‘फीफा’द्वारा मान्यताप्राप्त ‘अ’ दर्जाची आंतरराष्टÑीय स्पर्धा आहे. १९६८ पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघाने याआधी १९७७ साली
आपला सहभाग नोंदवला होता. यंदा भारतापुढे थायलंड आणि व्हिएतनाम या संघांचे कडवे आव्हान राहील.

भारतीय संभाव्य फुटबॉल संघ
गोलरक्षक : गुरप्रीतसिंग संधू, विशाल कैथ, अमरिंदरसिंग आणि कमलजीतसिंग.
बचाव फळी : प्रीतम कोताल, निशु कुमार, राहुल भेके, सलाम रंजनसिंग, संदेश झिंगन, आदिल खान, अन्वर अली, शुभाशीष बोस व नारायण दास.
मधली फळी : उदांतासिंग, जॅकीचंदसिंग, ब्रँडन फर्नांडिस, अनिरुद्ध थापा, रेनियर फर्नांडिस, बिक्रमजीतसिंग, धनपाल गणेश, प्रणय हलधर, रोलिन बोर्गेस, जर्मनप्रीतसिंग, विनित रॉय, सहल अब्दुल, अमरजीतसिंग, रीडीम तलांग, लालरिजुआला छांगटे, नंदा कुमार, कोमल थताल, मायकेल सूसइराज.
आक्रमक फळी : बलवंतसिंग, सुनील छेत्री, जॉबी जस्टिन, सुमीत पासी, फारूख चौधरी व मनवीरसिंग.

Web Title:  Declared 37 potential players for the Kings Cup football

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.