Cristiano Ronaldo gifts fans with a new celebration after scoring against Sassuolo - Watch | ख्रिस्तियानो रोनाल्डोचं चाहत्यांना गिफ्ट, सेलिब्रेशनची स्टाइल बदलली, पाहा व्हिडीओ...
ख्रिस्तियानो रोनाल्डोचं चाहत्यांना गिफ्ट, सेलिब्रेशनची स्टाइल बदलली, पाहा व्हिडीओ...

युव्हेंटस : ख्रिस्तियानो रोनाल्डो गोल केल्याचं सेलिब्रेशन कसं करतो हे झोपेतून उठवूनही विचारल्यास चाहते पटकन उत्तर देतील. त्याच्या या सेलिब्रेशन स्टाइलने युवकांवर मोहिनी केली आहे. त्यामुळेचे रोनाल्डोला आदर्श मानणारा युवा वर्गही त्याची स्टाइल कॉपी करताना सर्रास दिसतात. मात्र, गोल केल्यानंतर कॉर्नर पॉईंटवर येत हवेत गोल फिरून प्रेक्षकांच्या दिशेने पाठमोरा उभा राहून सेलिब्रेशन करणाऱ्या रोनाल्डोने मंगळावरच्या सामन्यात वेगळ्याच स्टाइलने सेलिब्रेशन करून चाहत्यांना आश्चर्यचकीत केले. 

युव्हेंटस क्लबने मंगळवारी झालेल्या सामन्यात सासूओलो क्लबवर 3-0 असा सोपा विजय मिळवला. सॅमी खेडिरा ( 23 मि. ), रोनाल्डो ( 70 मि. ) आणि ईम्रे कॅन ( 86 मि. ) यांनी प्रत्येकी एक गोल केला. रोनाल्डोने 70व्या मिनिटाला पाऊलो डीबालाच्या पासवर गोल करताना केलेले सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरले. त्याने त्याच्या नेहमीच्या सेलिब्रेशनमध्ये किंचितसा बदल करताना डीबालाची कॉपी केली. 
पाहा व्हिडीओ...  याच सामन्यात रोनाल्डोच्या एका पासवर खेडिरा दुखापतग्रस्त झाला. रोनाल्डोने ताकदीनं गोलजाळीच्या दिशेने टोलावलेला चेंडू खेडिराच्या चेहऱ्यावर जाऊन आदळला आणि तो जमिनीवर पडला. रोनाल्डोन त्वरित खेडिराकडे धाव घेतली आणि त्याची विचारणा केली. 
पाहा व्हिडिओ...


Web Title: Cristiano Ronaldo gifts fans with a new celebration after scoring against Sassuolo - Watch
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.