ख्रिस्तीयानो रोनाल्डो व लिओनेल मेस्सीचा युगांत; फिफाने जाहीर केला सर्वोत्तम खेळाडू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 08:49 AM2018-09-25T08:49:39+5:302018-09-25T08:50:21+5:30

फिफाच्या सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारावर गेली दहा वर्षे ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी या दोन दिग्गजांचेच वर्चस्व होते. मात्र ती मक्तेदारी अखेरीस संपुष्टात आली.

Christians Ronaldo and Lionel Messi Era ended; Luka Modric win FIFA best men's player of the year award | ख्रिस्तीयानो रोनाल्डो व लिओनेल मेस्सीचा युगांत; फिफाने जाहीर केला सर्वोत्तम खेळाडू

ख्रिस्तीयानो रोनाल्डो व लिओनेल मेस्सीचा युगांत; फिफाने जाहीर केला सर्वोत्तम खेळाडू

googlenewsNext

माद्रिद : फिफाच्या सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारावर गेली दहा वर्षे ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी या दोन दिग्गजांचेच वर्चस्व होते. मात्र ती मक्तेदारी अखेरीस संपुष्टात आली. क्रोएशियाला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ऐतिहासिक भरारी मारून देणाऱ्या ल्युका मॉड्रीचने  2018 चा फिफा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. 2008 ते 2017 या कालावधीत रोनाल्डो आणि मेस्सी यांनी प्रत्येकी पाचवेळा हा पुरस्कार जिंकला होता. 



या पुरस्कारासाठी निवडलेल्या अंतिम तीन खेळाडूंमध्ये क्रोएशियाचा मॉड्रीच, पोर्तुगालचा रोनाल्डो आणि इजिप्तचा मोहम्मद सलाह यांच्यात चुरस होती. मेस्सीला दहा वर्षांत प्रथमच अव्वल तिघांत स्थान पटकावता आले नाही. त्यामुळे नव्या आव्हानवीरांत रोनाल्डो बाजी मारतो का, याची उत्सुकता होती. मात्र, यंदा पारडे त्याच्या बाजूने नव्हते.




मॉड्रीचने फिफाच्या या पुरस्कारापूर्वी विश्वचषक स्पर्धेतील गोल्डन बॉल आणि युरोपियन सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकला आहे. एकाच वर्षात हे तिन्ही पुरस्कार जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. 




 

Web Title: Christians Ronaldo and Lionel Messi Era ended; Luka Modric win FIFA best men's player of the year award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.