चॅम्पियन्स लीग हॉकी : भारताचा पाकिस्ताननंतर अर्जेंटीनावर दमदार विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2018 06:20 PM2018-06-24T18:20:29+5:302018-06-24T18:22:01+5:30

पाकिस्ताननंतर भारताने चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत अर्जेंटीनावर विजय मिळवला. या स्पर्धेतील भारताचा हा सलग दुसरा विजय ठरला.

Champions League hockey: India's strong win against Argentina | चॅम्पियन्स लीग हॉकी : भारताचा पाकिस्ताननंतर अर्जेंटीनावर दमदार विजय

चॅम्पियन्स लीग हॉकी : भारताचा पाकिस्ताननंतर अर्जेंटीनावर दमदार विजय

Next
ठळक मुद्देभारताने या स्पर्धेच्या पहिल्या लढतीत पाकिस्तानला 4-0 असे पराभूत करत दणदणीत विजय मिळवला होता.

नवी दिल्ली : पाकिस्ताननंतर भारताने चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत अर्जेंटीनावर विजय मिळवला. या स्पर्धेतील भारताचा हा सलग दुसरा विजय ठरला. भारताने अर्जेंटीनावर 2-1 असा विजय मिळवत स्पर्धेतील दबदबा कायम ठेवला.


भारताने या स्पर्धेच्या पहिल्या लढतीत पाकिस्तानला 4-0 असे पराभूत करत दणदणीत विजय मिळवला होता. या सामन्यात भारताच्या हरमनप्रीत सिंगने 17 व्या मिनिटाला गोल केला आणि संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 28 व्या मिनिटाला मनदीप सिंगने गोल करत भारताची आघाडी दुप्पट केली. अर्जेंटीनाकडून मॅटिअस पॅराडेसने तिसाव्या मिनिटाला गोल केला. पण त्यानंतर भारताने अर्जेंटीनाला गोल करण्याची संधी दिली नाही आणि सामना 2-1 असा जिंकला.

Web Title: Champions League hockey: India's strong win against Argentina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.