Champion League Football: Real Madrid win | चॅम्पियन लीग फुटबॉल : रियल माद्रिदचा मोठा विजय
चॅम्पियन लीग फुटबॉल : रियल माद्रिदचा मोठा विजय

लंडन  - करीम बेंजामा याने पूर्वार्धातील खेळात नोंदविलेल्या दोन गोलच्या बळावर रियल माद्रिदने चॅम्पियन लीग फुटबॉल स्पर्धेत व्हिक्टोरिया प्लॅजेनवर ५-० ने शानदार विजय नोंदविला. दुसरीकडे ख्रिस्टियानो रोनाल्डोच्या गोलनंतरही युवेंट्सला मॅनचेस्टर युनायटेडकडून १-२ ने पराभवाचे तोंड पहावे लागले.
झेक प्रजासत्ताकाच्या प्लेजेन शहरात झालेल्या सामन्यात करीम बेंजामाने २० आणि ३७, कासेमिरो २३, गेरेंथ बेल ४० आणि टॉमी क्रूझ याने ६७ व्या मिनिटाला गोल केला.
इटलीच्या तुरीन शहरात रोनाल्डोने ६५ व्या मिनिटाला चॅम्पियन्स लीगमध्ये स्वत:चा पहिला गोल केला खरा पण जुआन माटा याने फ्री किकवर बरोबरी साधल्यानंतर लियानार्डो बोन्सी याने ८९ व्या मिनिटाला स्वयंगोल करीत युनायटेडचा विजय निश्चित केला.
मॅनचेस्टर सिटी संघाने गॅब्रियल जिससच्या हॅट्ट्रिकमुळे डोनेस्कचा ६-० ने पराभव केला. बायर्न म्यूनिचने एईकेवर २-० ने विजय साजरा केला. बाद फेरी गाठण्याच्या स्थितीत असलेल्या रोमाने सीएसकेए मॉस्कोचा २-१ असा पराभव केला.(वृत्तसंस्था)


Web Title: Champion League Football: Real Madrid win
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.