शालेय फुटबॉल स्पर्धेसाठी मुला-मुलींचा संघ जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 09:53 PM2018-11-03T21:53:18+5:302018-11-03T21:53:35+5:30

जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेतून १९ वर्षांखालील मुलांच्या व १७ वर्षांखालील मुलींच्या राज्य संघाची निवड शनिवारी जाहीर करण्यात आली. दोन्ही संघात कोल्हापूरच्या प्रत्येकी सहा खेळाडूंचा समावेश आहे.

Boys and girls team for the school football tournament announced | शालेय फुटबॉल स्पर्धेसाठी मुला-मुलींचा संघ जाहीर

शालेय फुटबॉल स्पर्धेसाठी मुला-मुलींचा संघ जाहीर

Next

कोल्हापूर : जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेतून १९ वर्षांखालील मुलांच्या व १७ वर्षांखालील मुलींच्या राज्य संघाची निवड शनिवारी जाहीर करण्यात आली. दोन्ही संघात कोल्हापूरच्या प्रत्येकी सहा खेळाडूंचा समावेश आहे.

१९ वर्षाखालील मुलांच्या संघात नशांत शेट्टी अनिकेत गुजर, असिफ खान, श्रेयस वाटेकर, रोमित अधान, अभिनव अस्टीन (मुंबई), दिग्विजय आसणेकर, मयूरेश चौगुले, प्रणव कणसे, ऋतुराज सूर्यवंशी, कुणाल चव्हाण, नथानियन कृपाठे (सर्व कोेल्हापूर), सतीश हवालदार, विश्वनाथ शेळके, अनिकेत भडके, शंतनू नागोरकर (क्रीडा प्रबोधिनी), फैयाज खान (अमरावती), बादल सुरेन (नागपूर), अब्दुल फहाद , अतिफ खान (औरंगाबाद), पवन ठोकरे, अविरत मिश्रा (पुणे), सय्यद अय्यर (लातूर) यांचा समावेश आहे.

१७ वर्षाखालील मुलींच्या संघात स्नेहल कळमकर, कीर्ती गोसावी, आकांक्षा मडेकर, जीया सुंदरम, उर्वी साळोखे, अंजली बरके (पुणे), थोईबी चानू, निहारिका पाटील, सना तोम्बे, साक्षी जाधव, वैष्णवी डोमले, रिया बोलके (सर्व कोल्हापूर), डिनीस परेरा, परोमिता चक्रवती, आरूषी दयाल (मुंबई), एनी अँथोनी, रक्षदा सोनेकर, इशा सिल्लारे (नागपूर), सई काळे, क्षितिजा वराळ (क्रीडाप्रबोधिनी), ऋतुजा गर्जे, गौरी भलावी (अमरावती), मानसी आंधळे या २३ जणींचा समावेश आहे. सुनील पाटील, स्टॅनली ग्रेगरी, प्रशांत जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे या चार सदस्यीय समितीने हा संघ जाहीर केला. या संघाचे शिबिर लवकरच जाहीर केले जाणार आहे.
 

 

Web Title: Boys and girls team for the school football tournament announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.