रोनाल्डो झाला रक्तबंबाळ, हेडर मारताना खेळाडूचा पाय डोळ्याखाली लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 02:05 AM2018-01-23T02:05:19+5:302018-01-23T02:05:43+5:30

ला लीगा स्पर्धेच्या डिपोर्टिवो संघाविरुद्ध हेडरद्वारे गोल करण्याच्या प्रयत्नात रेयाल माद्रिदचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो जखमी झाल्याने रक्तबंबाळ झाला आणि उपस्थित चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. हा सामना बलाढ्य रियाल माद्रिदने ७-१ गोलने एकतर्फी जिंकला, मात्र चर्चा झाली ती रोनाल्डोला झालेल्या जखमेची. दरम्यान, मैदानाबाहेर उपचार करून पुन्हा परतलेल्या रोनाल्डोने आणखी एक गोल करत आपल्या झुंजार खेळाचे प्रदर्शनही केले.

 ... and Ronaldo was hit by a bloodbath, heading the player's feet while he was heading | रोनाल्डो झाला रक्तबंबाळ, हेडर मारताना खेळाडूचा पाय डोळ्याखाली लागला

रोनाल्डो झाला रक्तबंबाळ, हेडर मारताना खेळाडूचा पाय डोळ्याखाली लागला

googlenewsNext

माद्रिद : ला लीगा स्पर्धेच्या डिपोर्टिवो संघाविरुद्ध हेडरद्वारे गोल करण्याच्या प्रयत्नात रेयाल माद्रिदचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो जखमी झाल्याने रक्तबंबाळ झाला आणि उपस्थित चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. हा सामना बलाढ्य रियाल माद्रिदने ७-१ गोलने एकतर्फी जिंकला, मात्र चर्चा झाली ती रोनाल्डोला झालेल्या जखमेची. दरम्यान, मैदानाबाहेर उपचार करून पुन्हा परतलेल्या रोनाल्डोने आणखी एक गोल करत आपल्या झुंजार खेळाचे प्रदर्शनही केले.
रविवारी रात्री झालेल्या या सामन्यात जखमी झाल्यानंतर रोनाल्डोने मैदान सोडले. यानंतर त्याने चेहºयावरील जखमेवर आवश्यक उपचार करून दमदार पुनरागमन केले आणि आणखी एक गोल करत माद्रिदच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याआधी लोपेझ अल्वारेज याने २३व्या मिनिटालाच डिपोर्टिवो संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र यानंतर माद्रिदने सलग ७ गोलचा धडाका करत दणदणीत विजय मिळवला.
या वेळी एक हेडर करण्याच्या प्रयत्नात रोनाल्डो गंभीररीत्या जखमी झाला. उजव्या बाजूने आलेला पास हवेत हेडर करण्याच्या प्रयत्नात रोनाल्डोने झेप घेतली आणि गोलही केला. मात्र या वेळी प्रतिस्पर्धी संघाचा बचावपटू फॅबियिन स्कारचा पाय रोनाल्डोच्या डाव्या डोळ्याखाली जोरात लागला आणि रोनाल्डोचा चेहरा तत्काळ रक्तबंबाळ झाला. यानंतर माद्रिद संघाच्या फिजियोंनी मैदानात धाव घेत रोनाल्डोला मैदानाबाहेर आणले. डॉक्टरांनी रोनाल्डोला सावधपणे खेळण्याचा सल्ला दिला. परंतु, रक्तातच फुटबॉल भिनलेल्या रोनाल्डोने आपला आक्रमक खेळ कायम ठेवताना आणखी एक गोल करत आपला धमाकेदार खेळ सादर केला. (वृत्तसंस्था)

Web Title:  ... and Ronaldo was hit by a bloodbath, heading the player's feet while he was heading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.