लग्नातला मेन्यू हटके हवाय मग बदलेला मेन्यू ट्रेण्ड  माहिती असायलाच हवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 04:42 PM2017-12-25T16:42:04+5:302017-12-25T16:53:58+5:30

विवाह सोहळ्यासोबतच विवाहातला मेन्यू ट्रेण्ड ही झपाट्यानं बदलतो आहे. नवरदेव-नवरीच्या आवडीनिवडी, येणा-या पाहुण्यांना काय आवडू शकेल याचा अंदाज, ज्या ठिकाणी लग्न केले जात आहे तिथले विशेष पदार्थ या सर्वांचा विचार करून वेडिंग मेन्यू डिझाईन केला जातो आहे.

 Want to have something special in wedding menu ? Try this! | लग्नातला मेन्यू हटके हवाय मग बदलेला मेन्यू ट्रेण्ड  माहिती असायलाच हवा!

लग्नातला मेन्यू हटके हवाय मग बदलेला मेन्यू ट्रेण्ड  माहिती असायलाच हवा!

Next
ठळक मुद्दे* कस्टमाईज्ड मेन्यू हा देखील विवाह सोहळ्यातील अलीकडचा ट्रेण्ड आहे. जवळचे नातलग, मित्रपरिवार एकत्र बसून एन्जॉय करु शकतील असा मेन्यू हा सध्याचा हिट ट्रेण्ड आहे.* ‘फूड फॅशनिस्टा ही नवीन संकल्पना लग्न समारंभांसाठी अंमलात आणली जातेय. टेबल सेटिंग, डेकोर, व्हेन्यू लेआऊट यांचा अभ्यास करु न मेन्यू ठरवणारी ही एक टीम असते.* ट्रफल हा तर बहुतांश हाय प्रोफाईल लग्न समारंभातील सर्वात महत्वाचा घटक पदार्थ बनून गेलाय.

सारिका पूरकर-गुजराथी

सध्या डेस्टिनेशन वेडिंगची फॅशन जोरात आहे. लग्नातल्या परांपरा पध्दती तशाच ठेवून लग्नसोहळे अधिकाधिक विशेष आणि खास करण्यासाठी नवनवीन आयडिया लढवल्या जात आहेत. विवाह सोहळ्यासोबतच विवाहातला मेन्यू ट्रेण्ड ही झपाट्यानं बदलतो आहे. नवरदेव-नवरीच्या आवडीनिवडी, येणा-या पाहुण्यांना काय आवडू शकेल याचा अंदाज, ज्या ठिकाणी लग्न केले जात आहे तिथले विशेष पदार्थ या सर्वांचा विचार करून वेडिंग मेन्यू डिझाईन केला जातो आहे.


 

विवाहांमधली खाद्यबहार

1) विवाह सोहळ्यांमध्ये नानाविध प्रकारच्या पदार्थांचे स्टॉल्स असतात, हे चित्र आता फारसं नवीन राहिलेलं नाही. मात्र त्यात झालेला बदल म्हणजे इंटरनॅॅशनल शेफ्स हे एका विशिष्ट प्रकारच्या पाककृतीवर प्रयोग करु न म्हणा किंवा त्यावर फोकस करु न टेबलवर सादर करताना दिसताहेत.
2) कस्टमाईज्ड मेन्यू हा देखील विवाह सोहळ्यातील अलीकडचा ट्रेण्ड आहे. जवळचे नातलग, मित्रपरिवार एकत्र बसून एन्जॉय करु शकतील असा मेन्यू हा सध्याचा हिट ट्रेण्ड आहे. डेस्टिनेशन वेडिंगमध्ये तर आपल्या आवडीच्या शेफना बरोबर घेऊन जाऊन त्यांच्याकडून भरमसाठ किंवा 100 प्रकारचे पदार्थ बनविण्यापेक्षा अगदी चविष्ट, जिभेवर चव रेंगाळत राहील अशा मोजक्या 30-35 हटके पदार्थ तयार करण्याचाही ट्रेण्ड दिसून येतोय.

 

3) भव्य विवाह सोहळे ही भारतीय विवाह संस्कृतीची ओळख बनून गेले आहे. परंतु, काळ बदलला तसा विवाह ही एक अत्यंत खासगी बाब असल्यामुळे उगाच हजारोंच्या उपस्थितीत हा सोहळा रंगवण्यापेक्षा जवळच्या नातलगांच्या साक्षीनं तो करण्यावर भर दिला जात आहे. साहजिकच विवाह सोहळा आटोपशीर, त्याप्रमाणे त्यासाठीचा मेन्यूही आटोपशीर ठेवण्याचा ट्रेण्ड दिसून येत आहे.
4) बडेजाव दाखवायचा म्हणून उगाचच विविध प्रकारचे पदार्थ ठेवायचे. चायनीज, इटालियन पदार्थांचा मारा करायचा, हे चित्र आता हळूहळू बदलतेय. त्याऐवजी सेंद्रिय आणि शाकाहरी पदार्थांना विवाह सोहळ्यातील मेन्युमध्ये अग्रक्र मानं स्थान दिलं जातंय. भाज्या किंवा दुधा-तुपाचे पदार्थ आहेतच यात समाविष्ट, परंतु, शाकाहरी पदार्थांमधील घटक पदार्थांमध्येही बदल होत आहेत. बटाटा वाळवून त्याचं तयार केलेलं पीठ किंवा मग कमळफुलाचं पीठ यांसारख्या पीठाचा वापर करून स्टीम्ड फूड बनवण्याकडे आणि लग्नसमारंभातील मेन मेन्युमध्ये ठेवण्याचाही बदल दिसून येत आहे. व्हेज सुशी, व्हेज तापास बार हे स्पॅनिश, जपानी पदार्थ नव्यानं यादीत दिसू लागले आहेत.

 

5) डेस्टिनेशन वेडिंग हा आजचा सर्वाधिक लोकप्रिय ट्रेण्ड आहे. त्यातही पारंपरिक पद्धतीनं विवाह साजरा करताना शाही पॅलेस किंवा भव्य राजवाडा, महल अशा ठिकाणी जर साजरा न करता एखाद्या हवेलीत कंटेम्पररी डेकोर    करुन जोडीला जाझ म्युझिक आणि ग्लोबल मेन्यू अशा थाटात तो साजरा केला जातोय. म्हणजेच विवाह खाद्य संस्कृतीही ग्लोबल होत चाललीय, असं म्हणायला हरकत नाही.
6) ‘फूड फॅशनिस्टा ही नवीन संकल्पना लग्न समारंभांसाठी अंमलात आणली जातेय. टेबल सेटिंग, डेकोर, व्हेन्यू लेआऊट यांचा अभ्यास करु न मेन्यू ठरवणारी ही एक टीम असते. ही टीम परदेशातीलही असू शकते किंवा परराज्यातील. ही टीम तुमच्या स्थानिक मदतनीस ( शेफ, आचारी इ.) यांच्या साथीनं म् लग्नातील मेन्यूची बडदास्त ठेवते.
7) छोटा पॅक, बडा धमाका असेच काहीसे लग्नसमारंभातील पदार्थांमध्ये सध्या दिसून येतेय. लग्न समारंभातील पदार्थ स्मॉल पोर्शनमध्ये म्हणजेच लहानशा स्वरूपात सर्व्ह केले जाताहेत. पण हे पदार्थ सहसा फ्यूजन स्वरु पातील असण्यावर भर दिला जातोय. एकाच पदार्थात आणि एकाच बाइटमध्ये जास्तीत जास्त फ्लेवर्स यामुळे खवय्यांना एन्जॉय करता येऊ लागले आहेत.
8) ट्रफल हा तर बहुतांश हाय प्रोफाईल लग्न समारंभातील सर्वात महत्वाचा घटक पदार्थ बनून गेलाय. मशरूमचा हा एक प्रकार असून लग्न समारभांमध्ये चक्क ट्रफल स्टेशन स्टॉल्स उभारु न यापासून बनणारे पदार्थ खवय्यांच्या आॅन डिमांडवर आहेत.

 

9) रेस्टॉरण्ट थीम हा देखील सध्याच्या लग्न समारंभासाठीचा खूप मोठा हिट ट्रेण्ड आहे. पाहुणे मंडळींच्या आवडीचे किंवा त्यांना आवडतील अशा रेस्टॉरंटच्या चक्क प्रतिकृती लग्नसमारंभात खास जेवणावळीसाठी बनब्स्ल्या जात आहेत. या रेप्लिका उभारु न त्यात आसन व्यवस्थाही रेस्टॉरण्टसारखी ठेवली जाते. पाहुणे मंडळी मग त्यांच्या आवडीची आॅर्डर देवून जेवण मागवतात. यातला मेन्यू मात्र फिक्स असतो.

 

 

Web Title:  Want to have something special in wedding menu ? Try this!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.