Valentine Day special receipe chocolate swiss roll for your partner | Valentine Day : पार्टनरसाठी स्वतः तयार करा चॉकलेट स्विस रोल!
Valentine Day : पार्टनरसाठी स्वतः तयार करा चॉकलेट स्विस रोल!

सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरू असून व्हॅलेंटाइन डेसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. अशातच तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी खास करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तुमच्या हाताने हटके रेसिपी तयार करू शकता. असं म्हणतात की, एखाद्याच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा त्या व्यक्तीच्या पोटातून जातो. अशातच चॉकलेट म्हणजे, सर्वांना आवडणारा आणि तोंडाला पाणी आणणारा पदार्थ. चॉकलेटला 'यूनिवर्सल सिम्‍बल ऑफ लव्ह' असं म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी स्वतःच्या हाताने चॉकलेट स्विस रोल तयार खाण्यासाठी देऊ शकता. जाणून घेऊया चॉकलेट स्विस रोल तयार करण्याच्या रेसिपीबाबत...

साहित्य :

  • बिस्किट्स 30 ते 35 तुकडे
  • अर्धा कप दूध
  • कोको पावडर
  • कॉफी पावडर
  • पिठी साखर
  • बटर दोन टेबलस्पून
  • खवलेलं खोबरं
  • कंडेन्स दूध 2 चमचे
  • पिठी साखर
  • वेलची पावडर अर्धा चमचा

 

कृती :

- बिस्किटाचे छोटे-छोटे तुकडे करून ते मिक्सरमधून बारिक करून घ्या. 

- तयार बिस्किटांच्या पावडरमध्ये कोको पावडर, कॉफी पावडर, पिठी साखर आणि बटर एकत्र करून घ्या. त्यामध्ये हळूहळू दूध एकत्र करा आणि जोपर्यंत बॅटर एखाद्या पिठाप्रमाणे नरम आणि चिकट होत नाही तोपर्यंत मळून घ्या. पण एक लक्षात ठेवा तयार मिश्रण जास्त घट्ट असू नये किंवा जास्त नरम असू नये. 

- एका बाउलमध्ये सुकं खोबरं, पिठी साखर आणि वेलची पावडर एकत्र करा. 

- या मिश्रणामध्ये दूध टाकून थिक पेस्ट होइपर्यंत एकत्र करा. गरजेप्रमाणे दूधाचा वापर करा. कारण जर हे मिश्रण कोरडं झालं तर रोलचा आकार नीट होणार नाही. 

- एक बटर पेपर घेऊन त्यावर थोडं बटर लावून घ्या.

- आता तयार केलेलं बॅटर बटर पेपरवर ठेवा रोलरच्या मदतीने लाटून घ्या. 

- तयार केलेलं नारळाचं मिश्रण चपातीवर ठेवा आणि सगळीकडे समान लेव्हलमध्ये पसरवून घ्या. त्यानंत तुमच्या हातांनी थोडा दाब द्या. त्यामुळे मिश्रण सेट होण्यास मदत होइल. 

- आता बटर पेपरच्या सहाय्याने व्यवस्थित रोल करून घ्या.

- साधारण एका तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवा त्यामुळे रोल व्यवस्थित सेट होण्यास मदत होइल. 

- तासाभराने फ्रिजमधून बाहेर काढून गोल आकारामध्ये कापून घ्या. 

- तुमचा चॉकलेट स्विस रोल तयार आहे. 

- तुमच्या पार्टनरला व्हॅलेंटाइन निमित्ताने सर्व्ह करा. 


Web Title: Valentine Day special receipe chocolate swiss roll for your partner
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.