ठळक मुद्दे* ज्या विकिरणांच्या प्रक्रियेमुळे मायक्रोवेवमध्ये पदार्थ झटपट गरम होतात त्या विकिरणांमुळ पदार्थांभोवती किरणोत्साराचा वेढा निर्माण होतो ज्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.* मायक्रोवेवची रचना, कार्यपध्दती आणि मायक्रोवेव वापरण्याच्या पध्दती यांचा अभ्यास करून अभ्यासकांनी मायक्रोवेव आरोग्यास कसा घातक आहे हे सूचित केलं आहे.* खरंतर मायक्रोवेव चुकीच्या पध्दतीनं वापरल्यानंही तोटा होतो. म्हणून मायक्रोवेव जर योग्य पध्दतीनं वापरला तर मायक्रोवेवचे घातक परिणाम आपण सहज कमी करू शकतो असं अभ्यासकांचं मत आहे.


- माधुरी पेठकर


मायक्रोवेव हे सध्याच्या काळात स्वयंपाकघरात लागणारं महत्त्वाचं साधन आहे. प्रेस्टिज आणि गरज अशा दोन्ही कारणांसाठी प्रत्येकीला मायक्रोवेव स्वयंपाकघरात हवाच असतो. कमीत कमी वेळ आणि ऊर्जेमध्ये अन्न शिजवणंआणि गरम करण्यासाठी मायक्रोवेव अतिशय उपयुक्त ठरतो. पाणी उकळणे, दूध गरम करण्यापासून ते दोन मिनिटातली मॅगी आणखी झट की पट करण्यासाठी , पॉपकॉर्न भाजण्यासाठी अशा अनेक छोट्यामोठ्या कारणांसाठे मायक्रोवेव वापरला जातो.
मायक्रोवेवचा उपयोग आणि फायदे वादातीत असताना मायक्रोवेवच्या परिणामांचा अभ्यासही जोरात सुरू आहे. असाच एक अभ्यास नुकताच प्रसिध्द झाला आहे. हा अभ्यास मायक्रोवेवचा उपयोग अगदी जपून करायला सांगतो. या अभ्यासाच्या मते कळणा-या, न कळणा-या,किरकोळ-गंभीर अशा अनेक आजारांचं मूळ मायक्रोवेव ठरू शकतो. एका स्वीस वैज्ञानिकानं केलेल्या अभ्यासात त्यांना असं आढळून आलं आहे की मायक्रोवेवमध्ये अन्न शिजवताना अन्नाचा कस कमी होतो. ज्या विकिरणांच्या प्रक्रियेमुळे मायक्रोवेवमध्ये पदार्थ झटपट गरम होतात त्या विकिरणांमुळ पदार्थांभोवती किरणोत्साराचा वेढा निर्माण होतो ज्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.

मायक्रोवेव वापरताना तो जेव्हा सुरू केला जातो तेव्हा लगेच छोट्या छोट्या विद्युत लहरी मायक्रोवेवमध्ये फिरू लागतात. या विद्युत लहरी मायक्रोवेवमध्ये विद्युतचुंबकीय विकिरण घडवून आणतात. या लहरी जोर जोरात कंप पावतात. एका मिनिटात 2,500 मेगाहर्टझ इतका त्यांचा प्रचंड वेग असतो. हा वेग आपण जो मोबाइल वापरतो त्या मोबाइलमधील लहरीही एवढ्याच वेगानं काम करत असतात.

मायक्रोवेवची रचना, कार्यपध्दती आणि मायक्रोवेव वापरण्याच्या पध्दती यांचा अभ्यास करून अभ्यासकांनी मायक्रोवेव आरोग्यास कसा घातक आहे हे सूचित केलं आहे. अभ्यासकांच्या मते मायक्रोवेवमधील अन्न सतात खाल्ल्यानं रोगप्रतिकारकशक्ती कमी होवू शकते. मायक्रोवेवच्या अतिवापरानं कर्करोगासारखे दुर्धर आजार होतात. विषाणू आणि संसर्गाशी लढण्याच्या प्रतिकारक्षमतेवर मायक्रोवेव परिणाम करतो. मायक्रोवेव अन्नातला कस कमी करतो तर मायक्रोवेव सतत वापरणाºयांच्या रक्तातील साखरही मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून आलं आहे.
अभ्यासकांनी मायक्रोवेवच्या या घातक परिणामांवर आपल्या अभ्यासातून प्रकाश टाकला आहे. पण याचा अर्थ मायक्रोवेव वापरायचाच नाही असं नाही. खरंतर मायक्रोवेव चुकीच्या पध्दतीनं वापरल्यानंही तोटा होतो. म्हणून मायक्रोवेव जर योग्य पध्दतीनं वापरला तर मायक्रोवेवचे घातक परिणाम आपण सहज कमी करू शकतो असं अभ्यासकांचं मत आहे.मायक्रोवेव कसा वापरावा?

* मायक्रोवेवची स्थिती उत्तम असायला हवी.
* मायक्रोवेवमध्ये अन्न गरम करताना किंवा तयार करताना खास मायक्रोवेव सेफ कंटेनरचाच उपयोग करायला हवा.
* लहान बाळांचं अन्न मायक्रोवेवमध्ये करणं टाळायला हवं.
* द्रव पदार्थ मायक्रोवेवमध्ये गरम करताना कायम एक काळजी घ्यायला हवी की हे पदार्थ अजिबात उकळता कामा नये.
* निर्धारित वेळेपेक्षा मायक्रोवेवमध्ये जास्त वेळ पदार्थ गरम करू नये किंव ठेवू नये.
* मायक्रोवेवचा उपयोग भाजा शिजवण्यासाठी करावा. मांसाहारी पदार्थ गरम करण्यासाठी मायक्रोवेवचा उपयोग करू नये.
* ब-याचदा नोकरी करणा-या महिला लहान बाळासाठी आपलं दूध काढून ठेवतात आणि मायक्रोवेवमध्ये कोमट करून मुलांना पाजतात ही अत्यंत चुकीची पद्धत आहे.
* मायक्रोवेवमध्ये पाणी गरम करू नये किंवा कोणताही द्रवपदार्थ मायक्रोवेवमध्ये गरम करू नये.
मायक्रोवेव वापरताना एवढी जरी काळजी घेतली तरी मायक्रोवेव आरोग्यास घातक न ठरता फायदेशीर ठरू शकतो.

 

 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.