श्वास आणि फुफ्फुसाच्या समस्या दूर करण्यासाठी तीन आयुर्वेदिक पेय!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 12:43 PM2018-11-21T12:43:14+5:302018-11-21T12:43:34+5:30

श्वास आणि फुफ्फुसांचे आजार होण्याची संख्या अलिकडे फारच वाढली आहे. वाढतं वायू प्रदुषण आणि कमी शारीरिक श्रम यामुळे फुफ्फुसं कमजोर होत आहेत.

Three Ayurvedic drink for breath and lung disease | श्वास आणि फुफ्फुसाच्या समस्या दूर करण्यासाठी तीन आयुर्वेदिक पेय!

श्वास आणि फुफ्फुसाच्या समस्या दूर करण्यासाठी तीन आयुर्वेदिक पेय!

googlenewsNext

श्वास आणि फुफ्फुसांचे आजार होण्याची संख्या अलिकडे फारच वाढली आहे. वाढतं वायू प्रदुषण आणि कमी शारीरिक श्रम यामुळे फुफ्फुसं कमजोर होत आहेत. भारतात तर अनेक शहरांची हवा विषारी झाली आहे. ज्या लोकांना श्वासासंबंधी आजार आहेत, त्यांना याचा जास्त फटका बसत आहे. सीओपीडी आणि अस्थम्यांच्या आजारांनी ग्रस्त लोकांना वायू प्रदुषणाची सर्वात जास्त समस्या होत आहे. मात्र श्वास आणि फुफ्फुसांना मजबूत करण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय आहेत. आज आम्ही तुम्हाला तीन वेगवेगळे पेय पदार्थ सांगणार आहोत, जे तुम्ही घरी सहज तयार करु शकता. याने तुम्हाला फायदा होईल.

तुळशीची पाने आणि आलं

साहित्य

१ ग्लास पाणी
५०६ तुळशीची पाने
१ चमचा आलं(बारीक केलेलं)
चवीनुसार गूळ

कसं कराल तयार?

एका भांड्यात एक ग्लास गरम पाणी टाकून कमी आसेवर गॅसवर ठेवा. यात तुळशीची पाने, आल्याची पेस्ट गूळ टाकून ५ मिनिटे उलळू द्या. जेव्हा या मिश्रणाला चांगली उकळी येईल तेव्हा हे मिश्रण ग्लासमध्ये टाका. हे तुम्ही दररोज थोडं थोडं सेवन करु शकता. या सिरपमुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होईल आणि शरीराचा वायू प्रदुषणाच्या प्रभावांपासून बचावही करेल.   

तुळशीची पाने, मध आणि लिंबाचा रस

साहित्य

१ ग्लास पाणी
५ ते ६ तुळशीची पाने
१ चमचा मीठ
१ चमचा मध
अर्धा लिंबू

कसं कराल तयार?

एक ग्लास पाणी एका भांड्यात कमी आसेवर गॅसवर ठेवा. नंतर यात तुळशीची पाने, मीठ, लिंबाचा रस आणि मध टाका. हे मिश्रण चांगल्याप्रकारे उकळू द्यावे. त्यानंतर ते थंड होऊ द्या. हे प्यायल्याने पोट साफ राहतं आणि इतरही अनेक समस्या दूर होतात. 

आयुर्वेदिक चहा

साहित्य

१ ग्लास पाणी 
छोटा तुकडा आले
१ काळी मिरे
३ ते ४ तुळशीची पाने
काही थेंब तूप
अर्धा चमचा हळद

कसं कराल तयार?

एका भांड्यात दूध टाकून ते कमी आसेवर गॅसवर ठेवा. नंतर त्यात हळद, तूप, आलं, काळे मिरे, लवंग आणि तुळशीची पाने टाका. ५ मिनिटे हे मिश्रण चांगलं उकळू द्या. नंतर यात मध टाका. हे दूध लहान मुलांसोबतच मोठ्यांसाठीही फायदेशीर आहे. 
 

Web Title: Three Ayurvedic drink for breath and lung disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.